कथोरेंच्या पाठीशी प्रत्यक्ष मुख्यमंत्री त्यामुळे चिंता करू नका



  • बदलापुरात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन 

अंबरनाथ, ( अशोक नाईक ) : बदलापूर सारख्या ऐतिहासिक शहरामध्ये छत्रपती शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला प्रत्यक्ष महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. मी त्याबद्दल बदलापूर नगरपालिका आणि आमदार किसन कथोरे यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो. पाच वेळा कथोरे साहेब निवडून आलेत, पण ते मंत्री झाले नाहीत. पण ते मंत्रापेक्षा कमी आहेत का? ते जे मंत्री करू शकत नाही ते करू शकतात आणि त्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष मुख्यमंत्री उभा आहे  त्यामुळे तेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे चिंता करू नका, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापुरात शिवरायांच्या अश्वरूढ पुतळाच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी केले. यावेळी मुख्यमंत्री 'माझा भाऊ...देवा भाऊ'असा जयघोष करत लाडक्या भगिनींनी सामूहिक मोठा पुष्पहार घालून मुख्यमंत्र्यांचे बदलापूर नगरीत स्वागत केले.


शिवकालीन बदलापूर म्हणून अधिकृत मान द्या-आमदार किसन कथोरे

बदलापूर हे ऐतिहासिक आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे बदलण्याचे ठिकाण होते. त्याच्यावरूनच बदलापूर हे नाव पडले. १९२० पासून शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराज मंदिर बदलापूर गावात आहे. १९२७ ला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शिवजयंतीचे अध्यक्ष होते. केवळ शिवरायांचा पुतळा बसवणे हा विषय नाही तसेच या ठिकाणी स्मारक उभं केलं जातंय. त्या ठिकाणी देखील ५५ फुटांचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांचा पुतळा उभा करतोय. एकूणच अशी या परिसरातील अनेक नतमस्तक होण्याची स्थळे निश्चितपणे म्हणाला समाधान देतील. पर्यटनात्मक दृष्ट्या वाव मिळेल.त्यामुळे 'शिवकालीन बदलापूर' म्हणून अधिकृत मान द्यावा. विकासाच्या बाबतीत आपण खूप निधी दिला. मात्र काही मोठे प्रकल्प होते ते थांबून राहिले. बाजूच्या उल्हास नदीतील कधी खोली किंवा गाळ काढण्यात आला नाही. त्यामुळे बदलापूर शहरात पाणी शिरते. रेड आणि ब्लू लाईन विशेष थांबून जाईल. मेट्रो प्रकल्प, सॅटिस प्रकल्प, वडोदरा एक्सप्रेस, मुंबई-लातूर हायवे या सर्व मार्गाना बदलापूरमधून जाळ विणलं गेलं, तर जलद गतीने या शहरातून इच्छित स्थळ गाठता येईल. या उल्हास नदीचा डीपी आर तयार केला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून या विषयावर लक्ष घालावे असे अनेक मुद्दे आमदार किसन कथोरे यांनी यावेळी मांडले. 



अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून ज्यांना कुठला चेहरा नव्हता, कुठली ओळख नव्हती, त्यांना प्रशिक्षित करून त्यांच्यातले पौरुषत्व जागरूक करून त्या सामान्य माणसांकडून असामान्य काम करून घेण्याचे धारिष्ट शिवरायांनी करून दाखवले. आणि त्या सामान्य माणसांच्या जोरावर स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम प्रशासक होते. पाणी जंगल किल्ले आरमार प्रत्येक गोष्टीचे चांगले नियोजन केले होते. आया- बहिणींना सन्मान होता. आजही इतक्या वर्षानंतर शिवरायांचे नाव घेतलं तरी रक्त सळसळते. आमच्यासारखे राज्यकर्ते देखील जेव्हा राज्य करतात त्या ठिकाणी कोणाकडे पाहून राज्य करावे, असा विचार येतो, त्यावेळी एकीकडे भारतीय संविधान आणि त्याचबरोबर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज असतात. ज्यांनी खऱ्या अर्थाने राज्यकारभार कसा चालवावा याचा वास्तू पाठ दिलेला आहे. म्हणूनच केवळ पुतळा नाही.  हे प्रेरणेच स्थान आहे. हे एक असे स्थान आहे,ज्यातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी पुढची वाटचाल करायची आहे. बदलापुरात हे प्रेरणास्थान निर्मिती केल्याबद्दल बदलापूर नगरपालिका आणि आमदार किसन कथोरे यांचे मी मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो. असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण सोहळ्याप्रसंगी सभेत व्यक्त केला. 


बदलापुरात उल्हास नदीच्या तीरावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी आमदार किसन कठोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवरायांची प्रतिमा तलवार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी खासदार सुरेश उर्फ (बाळ्या मामा) म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार कुमार आयलानी, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, तसेच मुरबाड बदलापूर शहरातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.




Post a Comment

Previous Post Next Post