जळगावात वीज बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो

 



आ. रवींद्र चव्हाण यांचे कारवाई करण्याचे आश्वासन 


डोंबिवली ( शंकर जाधव ) :   जळगाव येथे वीज बिलांवर उद्धव ठाकरे यांचा फोटो असल्याने याबाबत पत्रकरांनी विचारले असते भाजप संघटन पर्व प्रदेश प्रभारी म्हणाले, जे घडलं ते योग्य नाही याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. हे चुकून झालं असेल तर ठीक मात्र जर हेतुपरस्पर घडत असेल तर संबधीतांवर शासन म्हणून कारवाई करण्यात येईल. भाजपच्या देश राज्यव्यापी अभियानातर्फे डोंबिवलीत आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शेलार नाका येथे संघटन पर्व या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यावेळी आमदार चव्हाण बोलत होते.

   पुढे बोलताना आमदार चव्हाण म्हणाले, अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. त्यानंतर महायुतीचे सरकार आल्यावर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आता देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. मात्र जळगावात महावितरण कंपनीने वीजेच्या बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो असल्याचे दिसून आले. वीज बिलांवर ठाकरेंचा फोटो पाहून ग्राहक काहीसे शॉक झाले.




    भाजपच्या देश राज्यव्यापी अभियानातर्फे डोंबिवलीत आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शेलार नाका येथे संघटन पर्व या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराघरात जाऊन प्राथमिक सदस्य अभियानाची सुरुवात करा असे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर रविवारी या अभियानाची सुरुवात करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आकर्षण आहे. महायुती सरकार आल्यानंतर चांगलं वातावरण आहे. तरुण-तरुणींचे जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्यासाठी भाजप युवा मोर्चातर्फे सात ते दहा तारखेपर्यंत महाविद्यालयाच्या बाहेर कॅम्प लावण्यात येणार आहेत.  १८ ते २४  वर्ष वयोगटापर्यंत २५ लाखाहून अधिक सदस्य करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post