टिटवाळाजवळील वासुंद्रीगावात पावसात उघड्यावर अंत्यविधी

 

 प्रशासनाच्या उदासीनतेवर संताप

कल्याण \ शंकर जाधव : टिटवाळ्यात भर पावसात उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ नागरिकांवर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


व्हायरल व्हिडिओमध्ये अंत्यविधी सुरू असताना काही तरुण हातात ताडपत्री धरून उभे असल्याचे दिसत आहे. पावसापासून चितेचे रक्षण करण्यासाठी तरुणांची ही धडपड सुरू होती. या व्हिडिओच्या माध्यमातून स्थानिक तरुणांनी आपली व्यथा मांडली आहे.


अनेक वर्षांपासून या भागात स्मशानभूमीसाठी जागेची मागणी केली जात आहे. मात्र, प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. छत नसलेल्या उघड्या जागेवर अंत्यविधी करावे लागत असल्याने ऐन पावसाळ्यात नातेवाईकांचे हाल होत आहेत.स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने सोडवून कायमस्वरूपी शेड आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post