नवी मुंबई : उच्च न्यायालय, मुंबई यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नोटीस देऊनही संबंधितांनी नोटिशीची दखल न घेतल्यामुळे अनधिकृत बांधकामांविरोधात नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (२) डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाने ऐरोली, कोपरखैरणे व बेलापूर विभागात अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऐरोली कार्यक्षेत्रातील बी-४५८,बी-४५९, बी-४६०, सी-५१९, सी-५२०, सी-२०६ व सी-२०७, सेक्टर-२ ऐरोली येथे नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे आरसीसी इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. सदर अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबंधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवल्याने त्यावर महानगरपालिकेने कारवाई करत ते बांधकाम अंशत: निष्कासित केले.
या धडक मोहिमेसाठी ८ ब्रेकर, ६ हॅमर, ३ गॅस कटर, २० मजूर व ०१ मुकादम यांचा वापर करण्यात आला. सदर मोहिमेकरीता सहा. आयुक्त डॉ. अंकुश जाधव जी विभाग ऐरोली, एच विभाग दिघा व एफ विभाग घणसोली येथील अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. सदर कारवाई अंतर्गत प्रत्येक बांधकाम धारकाकडून २५,०००/- प्रमाणे एकूण दंडात्मक १,७५,०००/- वसूल करण्यात आले आहे.
कोपरखैरणे विभाग अंतर्गत प्रभुराव नरसिंहराव जगदनकर,SS टाईप,रूम नं ४००,सेक्टर-७,कोपरखैरणे, नवी मुंबई. यांच्या बांधकामास नोटीस बजावण्यात आली होती. सदर बांधकामावर तोडक कार्यवाही करण्यात आली. सदर बांधकाम धारकांकडून रु.१०,०००/- दंड वसूल करण्यात आला.
सदर अनधिकृत बांधकामावर कोपरखैरणे विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाचे सहा. आयुक्त सुनिल काठोळे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत धोत्रे व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. तसेच सदर कारवाईसाठी नमुंमपा पोलीस बंदोबस्त होता. तसेच ८ मजूर, ०२ इलेक्ट्रॉनिक हॅमर, गॅस कटर ०१,पिकअप व्हॅन ०१ कारवाई करीता वापर करण्यात आले.
बेलापूर विभागाअंतर्गत १) स्मिता प्रमोद भोईर, घर क्र. २८८/००१८५ करावे गांव, से.३६ नवी मुंबई, २) पुनम किशोर पाटील, घर नं. ०८२४/०००५, करावे गांव, से. ३६, ३) भरत तांडेल, घर क्र. ८२३ करावे गांव नवी मुंबई यांचे अनधिकृत बांधकामास नोटीस बजाविण्यात आलेल्या आहेत. तसेच मंगेश वसंत पवार/ कल्पना वसंत पवार/ अनिता मंगेश पवार, ट्रायसिटी पॅलेस, प्लॉट नं०७, प्लॅट नं. ३०३, से.३८ करावे गांव नवी मुंबई यांना नोटीस बजाविण्यात आलेली आहे.