डोंबिवली स्टेशनपरिसरात फेरीवाल्यांची दादागिरी

 

फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश

डोंबिवली / शंकर जाधव : स्टेशनबाहेरील परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकाला कारवाई करणे अवघड झाल्याचे दिसते. कारवाईचा बडगा उगारला असता फेरीवाल्यांची दादागिरी सुरू होत असल्याने पठाकप्रमुख व कर्मचाऱ्यांना कारवाई करणे मुश्किल होऊन बसले आहे.रविवारी सायंकाळच्या सुमारास 'ग' प्रभाग क्षेत्र पथकप्रमुख व कर्मचारी कारवाई करत असताना फेरीवाल्यांवर वरदहस्त असलेले 'दादा' 'भाई' भांडण करण्यास पुढे आले.मात्र कारवाईत करताना पोलीस नसल्याने फेरीवाल्यांची दादागिरी वाढत गेली.अखेर पालिका आयुक्तांना घडलेला प्रकार संगीतल्यांवर फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करा असे निर्देश दिले.

   डोंबिवली पूर्वेला स्टेशनबाहेरील परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर करवाई सुरू असताना काही फेरीवाल्यांनी कारवाईला अडथळा निर्माण केला.स्टेशनसमोरील प्रियांका जूस सेंटर समोर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना काहीनी दादागिरीची भाषा केली.याठिकाणी दोन फेरीवाल्यांवरील वाद सुरू आहे.मात्र नियमानुसार या ठिकाणी बसल्यास मनाई आदेश असक्याचे पथकप्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी सांगितले असतानाही त्यांनाही दादागिरी करण्यात आली.यावेळी भाजप पदाधिकारी प्रकाश पवार हे साळुंखेच्या मदतीला धावून आले.पवार यांनी पालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांडगे यांना फोन करून घटनेची माहिती दिली.आयुक्तांनी साळुंखे यांना नियम मोडणाऱ्या फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल करा असे निर्देश दिले.

 पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने कारवाई करताना फेरीवाल्यांवर दादागिरी भाषा ऐकावी लागले.तसेच पोलीस बंदोबस्त नसल्याने फेरीवाले बिनदास्तपणे पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर येण्यास बाघरत नाहीत.अश्या परिस्थतीत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास पठाकप्रमुख व कर्मचारी घाबरत असून फेरीवाल्यांची गुंडगिरी वाढल्यास आपल्या जीवाला धोका असल्याने कारवाई करणार तरी कशी अशी भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


फेरीवाल्यांचा ' दादा' कोण ? 

     अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात असताना दुसरीकडे मात्र फेरीवाल्यांचा ' दादा' पुढे येऊन फेरीवाल्यांच्या डोक्यावर हात ठेवत आहे.डोंबिवली पूर्वेकडील रामनगर तिकीट घरासमोरील रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांवरही 'दादा' म्हणविणारा कोण आहे ? कोण आहे जो फेरीवाल्यांना बसल्यास जागा देऊन ती जागा आपली असल्याचे दाखवून मलिदा खात आहे ? अशी चर्चा फेरीवाल्यांंमध्ये दबक्या आवाजात सुरू 


कारवाई करताना पोलीस बंदीबस्त आवश्यक

   अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना अनेक वेळेला पोलीस बंदोबस्त नसल्याने पथकप्रमुख आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे.तर फेरीवाल्यांंमध्ये मारामारीचा घटना घडल्या असून भररस्त्यात धारदार शस्त्रही दाखविण्यात आली होती.





मधूबन गल्ली, उर्सेकर वाडी, रामनगर तिकीट घरासमोर फेरीवाल्यांचे बस्तान वाढले..

   डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनसमोरील मधूबन गल्ली, उर्सेकर वाडी, रामनगर तिकीट घरासमोर फेरीवाल्यांचे बस्तान वाढल्याचे दिसते. पालिकेकडून कारवाई सुरू असूनही फेरीवाले याठिकाहून जाण्यास तयार नाहीत.येथे फेरीवाल्यांनी अनधिकृत शेड लावले पालिकेने शेड तोडावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.मधूबन गल्ली फेरीवाला मुक्त करण्यास पालिका प्रशासनाला यश येणार आहे का असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post