पोरबंदर : गुजरातमधील पोरबंदर विमानतळावर तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. भारतीय तटरक्षक दलाचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर नियमित उड्डाण करत असते. अपघातात मृत पावलेले तिघे क्रू मेंबर्स होते. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रविवारी तटरक्षक दलाचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरने नियमितपणे उड्डाण केले मात्र उतरताना ते अचानक पोरबंदर हवाई पट्टीवरच कोसळले. हेलिकॉप्टर कोसळताच त्याला आग लागली. भारतीय तटरक्षक दलाने सांगितले की, हेलिकॉप्टरमध्ये २ पायलटसह ३ लोकांचा समावेश होता. हेलिकॉप्टरला आग लागल्याने सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अन्य दोन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तटरक्षक दलात 16 ALH ध्रुव हेलिकॉप्टरचा समावेश आहे. जे बंगळुरू स्थित हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे डिझाइन आणि निर्मित केले गेले आहे. ध्रुव फ्लीट, डिझाईनच्या समस्यांमुळे त्याच्या उड्डाणाप्रसंगी सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
मागील वर्षी २ सप्टेंबर रोजी भारतीय तटरक्षक दलाचे (ICG) प्रगत हलके हेलिकॉप्टर (ध्रुव) पोरबंदर किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात कोसळले होते. यावेळी हेलिकॉप्टरमधील चार क्रू मेंबर्सपैकी एक जण बचावला, तर तीन क्रू मेंबर्स बेपत्ता झाले होते.
.jpeg)