Bird flu: बर्ड फ्लूमुळे चंद्रपूरमध्ये वाघांचा मृत्यू

 



तीन वाघ आणि एका लहान बिबट्याचा समावेश 

संपूर्ण महाराष्ट्रात रेड अलर्ट


चंद्रपूर : महाराष्ट्रातील नागपूरजवळील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघ आणि एका लहान बिबट्याचा एव्हियन फ्लू H5N1 विषाणूमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बर्ड फ्लूमुळे वाघांचा मृत्यू होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.


डिसेंबर महिन्यात चंद्रपूरमधील ग्रामस्थांवर वाघांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्या प्राण्यांना गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये हलवण्यात आले होते. मात्र त्यापैकी एक वाघ २० डिसेंबरला तर इतर दोन वाघ २३ डिसेंबरला मरण पावले. वाघांच्या मृत्यूनंतर काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळेे वाघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे तपासण्याचे काम भोपाळ येथील ICAR-NISHAD ला देण्यात आले होते. 


 ज्याचा अहवाल १ जानेवारीला आला. यामध्ये H5N1 बर्ड फ्लूमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली. दरम्यान, गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या २६ बिबट्या आणि १२ वाघांची चाचणी करण्यात आली असून ते सर्व निरोगी असल्याचे सांगण्यात आले आहे. या विषााणूचा अधिक पसार होऊ नये यासाठी महाराष्ट्रातील सर्व प्राणीसंग्रहालय, बचाव केंद्र आणि संक्रमण केंद्रांवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


वन्य मांसाहारी प्राण्यांमध्ये बर्ड फ्लू हा संसर्गग्रस्त रोग शिकार किंवा कच्चे मांस खाल्ल्याने पसरत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सध्या H5N1 विषाणूचा स्रोत शोधण्याचे काम अधिकारी  करत आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post