अलिबाग प्रेस असोसिएशनचे तेजस्विनी पुरस्कार जाहीर

 


आदिती तटकरे यांच्याहस्ते होणार पुरस्कार वितरण


अलिबाग/ धनंजय कवठेकर :  अलिबाग प्रेस असासिएशनतर्फे तेजस्विनी पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आले आहेत. अंकिता उल्हास राऊत, मिलन कृष्णा राणे,  मोनिका मोहन औचटकर, रुचिका विलास शिर्के,  प्रियांका संदेश गुंजाळ यांची  तेजस्विनी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुक्रवारी ( दि.७) पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. 


          विविध क्षेत्रात उल्लेखनीय  काम करणार्‍या परंतु प्रसिध्दीपासून दूर असलेल्या कर्तृत्ववान महिलांना अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून  दरवर्षी  तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. कलाक्षेत्रात काम करणाऱ्या अंकिता उल्हास राऊत, कृषिक्षेत्रातून  सौ. मिलन कृष्णा राणे, पुरुषांची मक्तेदारी असलेल्या वीजजोडणी विभागात कामकरणाऱ्या मोनिका मोहन औचटकर, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील  रुचिका विलास शिर्के,  क्रीडाक्षत्रात काम करणऱ्या प्रियांका संदेश गुंजाळ यांची यंदाच्या तेजस्विनी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.   


    महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे , जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, निवासी उप जिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा  प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. तेजस्विनी पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवारी (दि. ७ ) मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय , अलिबाग येथे  आयोजित करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post