अंबरनाथ, बदलापूर परिसरात धुळीचे वादळं !



अंबरनाथ/अशोक नाईक:  राज्यभरात उष्णतेचा कलह वाढत आहे. त्यात अवकाळी पावसाचा सिडकावा देखील होत असताना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड परिसरात देखील चाळीशीवर पारा चढतोय! शुक्रवारी सकाळपासून वातावरण ढगाळ होतं. मात्र उष्णता तीव्र जाणवत होती. 




दरम्यान साडेतीन, पावणे चारच्या सुमारास अचानक हवा जोरात सुटली. धूळ आणि कचरा उडाल्याने नागरिक आणि वाहनांची तारांबळ उडाली. धुळीच्या वादळामुळे शहरातील हवेची गुणवत्ता खालावल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी पत्रांची खडखड झाली. मंडप फाटले गेलेत, पालापाचोळा, कचऱ्यासह धुरळा उडाल्याने डोळे आणि श्वसनाला त्रास झाल्याची चर्चा सुरू आहे.



Post a Comment

Previous Post Next Post