गावठी कट्टा बाळगणाऱ्या व्यक्तीस अटक

 


 स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

जळगाव : घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) येथे एक इसम अवैध शस्त्र बाळगून असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यादृष्टीने कारवाई करत गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका व्यक्तीस अटक केली आहे. 


स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) येथे अर्जुन कोळी नावाचा इसम अवैध शस्त्र बाळगून होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करून या व्यक्तीचा मागोवा घेतला असता तो मुक्ताईनगर येथील प्रेम प्रतीक टी सेंटर जवळ असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन संशयित इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा सापडला. त्याच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोते, पोलीस हवालदार प्रीतम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र काणे, रविंद्र चौधरी आदींनी सहभाग घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्री महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नवाले, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आहवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


Post a Comment

Previous Post Next Post