एकनाथ शिंदेंचा यांच्या शब्दाचा मान राखत माजी नगरसेवक अमर पाटीलने निवडणूकीत उभे केले बायकोला
दिवा \ आरती परब: दिव्यात वॉर्ड २७ मध्ये दोन महिला आणि दोन पुरुष असे असताना माजी नगरसेवक अमर पाटील तर भाजपमधून आलेले ॲड. आदेश भगत यांच्या मध्ये महिला सीट कोण घेणार ? यावर जुंपली होती. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमर पाटील यांना समजावताच त्यांनी स्वतःची पुरुष सीट मागे घेत त्यांची पत्नी स्नेहा अमर पाटील यांना आगामी निवडणुकीत उभे केले.
स्वराज्य संस्थेचे निवडणुकीचे बिगुल वाजताच माजी नगरसेवक अमर पाटील आणि पक्षात आलेले यांच्या संघर्ष दिसत होता. पण दोन पुरुषांमध्ये एक महिला सीट घ्यायला कोणीही तयार नव्हते. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमर पाटील यांना नीट परिस्थिती समजावताच साहेबांच्या शब्दा खातीर तयार झाले. नंतर मग माजी नगरसेवक अमर पाटील यांनी मुंब्र्यात येऊन यांनी पत्नी स्नेहा अमर पाटील नावाचा एबी फॉर्म भरला.
