दिवा / आरती परब : रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे आणि पाटीलबाबा प्रतिष्ठान यांनी संयुक्तपणे एका भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा रविवार, १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १.३० या वेळेत गणेश विद्या मंदिर, नवीन इमारत, पहिला मजला, गणेश नगर, दातिवली, दिवा पूर्व येथे होणार आहे.
या मेळाव्यात यशस्वी कंपनी, ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, साई एंटरप्राजेस, एज्युकेशन इन्स्टिट्यूट, मॅग्नीशा इंचेर कॅम्प, आणि युवा लक्ष्य यांसारख्या नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या कंपन्यांमध्ये क्लार्क, एज्युकेटर, इलेक्ट्रिशियन, सुपरवायझर, ऑफिस बॉय, नर्सिंग स्टाफ, हाउसकीपर, पॅन्ट्री बॉय, सिक्युरिटी गार्ड, हेल्पर, आणि वॉर्ड बॉय यांसारख्या विविध पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
या मेळाव्यासाठी १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, बी.एस्सी, बी.कॉम, बी.एस्सी आयटी, बीएमएस, एम.कॉम, एमबीए, फायनान्स, बी.एड, आणि डी.एड अशी शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. रोटरी ऑफ दिवा, ठाणेचे अध्यक्ष किशोर पाटील, प्रोजेक्ट हेड नवनीत पाटील, युवराज बेडेकर, आणि सचिव स्वप्नील गायकर यांनी या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. दिव्यातील सुशिक्षित तरुण-तरुणींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या मेळाव्यात अनेक बेरोजगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि कौशल्याच्या आधारावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे दिली जातील, असे आयोजक नवनीत पाटील यांनी सांगितले.
Post a Comment