विजय सेल्सकडून ‘ॲपल डेज सेल’ची सुरुवात




२८ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान आयफोनसह प्रीमियम डिव्हाइसेसवर आकर्षक ऑफर्स

मुंबई : भारतातील आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स ओम्नी-चॅनेल रिटेल साखळी असलेल्या विजय सेल्सकडून बहुप्रतिक्षित ‘ॲपल डेज सेल’ची अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे. हा सेल २८ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत देशभरातील विजय सेल्सच्या १६० हून अधिक स्टोअर्समध्ये तसेच www.vijaysales.comया अधिकृत वेबसाइटवर आयोजित करण्यात आला आहे. या विशेष सेलमध्ये ग्राहकांना ॲपलच्या प्रीमियम उत्पादनांवर आकर्षक दरांचा लाभ मिळणार असून, यामध्ये नवीन आयफोन १७ सिरीज, मॅकबुक्स, आयपॅड्स, ॲपल वॉच, एअरपॉड्स तसेच ॲपल अ‍ॅक्सेसरीजचा समावेश आहे.

विजय सेल्सचे संचालक  निलेश गुप्ता यांनी सांगितले की, ॲपल डेज सेल पुन्हा एकदा ग्राहकांसाठी घेऊन येताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हा केवळ सूट देणारा सेल नसून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उत्सव आहे. आकर्षक डिल्स, एक्सचेंज बोनस आणि बँक ऑफर्समुळे ग्राहकांना त्यांच्या आवडत्या ॲपल डिव्हाइसेस अपग्रेड करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.


या सेलदरम्यान आयफोन १७ खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ₹३,००० पर्यंत मायVVS लॉयल्टी पॉइंट्स दिले जाणार असून, हे पॉइंट्स पुढील खरेदीसाठी स्टोअरमध्ये रिडीम करता येणार आहेत. ग्राहकांसाठी आयफोन १७, १७ प्रो, १७ प्रो मॅक्स तसेच आयफोन एअर ही नवीन मॉडेल्स आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहेत. यासोबतच आयफोन १६, १६ प्लस, १६ई, आयफोन १५ ही मागील लोकप्रिय मॉडेल्स देखील विशेष सवलतीत खरेदी करता येणार आहेत, ज्यामुळे अपग्रेड किंवा गिफ्टिंगसाठी उत्तम पर्याय उपलब्ध झाले आहेत.


ॲपल डेज सेलमध्ये चार्जर्स, केबल्स, ॲपल पेंसिल्स, केसेस यांसारख्या ॲक्सेसरीजवरही आकर्षक दर देण्यात येत आहेत. याशिवाय, निवडक डेमो व ओपन युनिट्स मर्यादित प्रमाणात विशेष किमतीत उपलब्ध असून, ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्वावर विक्री होणार आहे. विजय सेल्सकडून Apple Care+ आणि Protect+ सर्व्हिसेसवर सुमारे २०% सूट देण्यात येत असून, यामुळे नवीन खरेदी केलेल्या डिव्हाइसेसचे अतिरिक्त संरक्षण मिळणार आहे.


ICICI बँक व इतर निवडक बँक कार्डधारकांना ₹१०,००० पर्यंत त्वरित सूट, तसेच ₹१०,००० पर्यंतचा एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. शिवाय, मायVVS लॉयल्टी प्रोग्रामअंतर्गत प्रत्येक खरेदीवर ०.७५% लॉयल्टी पॉइंट्स मिळणार असून, प्रत्येक पॉइंटचे मूल्य १ रुपया आहे.

Post a Comment

Previous Post Next Post