किंमत फक्त ₹6,799 पासून
मुंबई : भारतामधील आघाडीच्या टेक ब्रँड आयटेलने आकर्षक डिझाइन आणि प्रबळ टिकाऊपणा असलेला A100 स्मार्टफोन लाँच केला आहे. MIL-STD-810H मिलिटरी-ग्रेड सर्टिफिकेशन असलेला हा फोन कठीण वापरासाठी सक्षम असून, किफायतशीर किमतीत प्रीमियम वैशिष्ट्ये देतो. A100 हा 64GB स्टोरेजसह (3+5GB) आणि (4+8GB) RAM** व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
आयटेलचे भारतभर ११ कोटीहून अधिक ग्राहक, १.३ लाखांहून अधिक रिटेल आउटलेट्स आणि १०००हून अधिक सर्व्हिस सेंटर्स आहेत. A100 ची किंमत ₹6,799 (3GB) आणि ₹7,499 (4GB) असून, भारतभरच्या रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. यासोबतच १०० दिवसांत मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफरही देण्यात आली आहे.
आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा म्हणाले, “ग्राहकांना दीर्घकाळ टिकणारा, आकर्षक आणि किफायतशीर स्मार्टफोन हवा असतो. A100 मध्ये मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा आणि UltraLinkसारखी उपयुक्त वैशिष्ट्ये देत आम्ही ही गरज पूर्ण केली आहे.”
मुख्य वैशिष्ट्ये:
-
6.6-इंच 90Hz HD+ डिस्प्ले, DTS-समर्थित साऊंड
-
8MP रिअर कॅमेरा प्रगत इमेज प्रोसेसिंगसह
-
IR ब्लास्टर – TV, AC व इतर उपकरणे नियंत्रित करण्यासाठी
-
ऑक्टा-कोअर Unisoc T7100 प्रोसेसर, Android 15 Go
-
फेस अनलॉक आणि साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर
-
5000mAh बॅटरी व 10W चार्जर
हा स्मार्टफोन Silk Green, Pure Black आणि Titanium Gold या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
