दिवा : चांद्रयान -३ चे चंद्रावर यशस्वी लॅंडिग झाल्याचे सर्व भारतीयांनी आपल्या घरातून ते क्षण अनुभवले. ते क्षण प्रत्येक दिवेकरांनी ही स्वतःच्या घरातून अनुभवले. आज दिव्यातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी दिवा स्टेशन परिसरात ढोल ताशा गजरात जल्लोष केला. त्यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर, अशोक पाटील तर भाजप महिला अध्यक्षा ज्योती पाटील यांनी हातातील राष्ट्रध्वज उंचावत 'भारत माता की जय' घोषणा दिल्या. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी नागरिकांना पेढे वाटून तोंड गोड करुन गुलाबाची फुले ही देण्यात आली.
यावेळी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर, सरचिटणीस समिर चव्हाण, ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, अशोक पाटील, विनोद भगत, विजय भोईर, व्यापारी संघटना अध्यक्ष जयदिप भोईर, जिलाजित तिवारी, डॉक्टर सेल विद्यासागर दुबे, अमरनाथ गुप्ता, विरेंद्र गुप्ता, उत्तर भारतीय अध्यक्ष अजय सिंग, नागेश पवार, गौरीशंकर पटवा, अशोक गुप्ता, अंकीत गुप्ता, भाजप महिला अध्यक्षा ज्योती पाटील, सपना भगत, इतर महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते.