स्वयंपाकघर चमकेल तरच आरोग्य फुलेल!

"घर असावे घरासारखे नसाव्यात नुसत्या भिंती .....'घर हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यासाठी महत्वाचे असते. विशेषतः एका स्त्रीचे ते स्वप्न असते. घरातील प्रत्येक कोपरं कोपरा सजवण्याचा ...स्वच्छ ठेवण्याचा तिलाच प्रयत्न असतो पण ताट तिचा वावर दिवसभरात ज्या ठिकाणी असतो ते म्हणजे तिचे स्वयंपाकघर.  घरातील सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्याचा थेट संबंध स्वयंपाकघराशी असतो. अन्न तयार करण्यापासून ते साठवण्यापर्यंत सर्व प्रक्रिया येथेच होत असल्याने स्वयंपाकघराची स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छ आणि नीटनेटके स्वयंपाकघर केवळ घराचे सौंदर्य वाढवत नाही, तर अनेक आजारांपासूनही संरक्षण देते आणि म्हणूनच ऋतू कोणताही असो स्त्री स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्याचे चॅलेंज स्वीकारते. तिच्या या चॅलेंजसाठी काही उपयोगी टिप्सद्वारे एक छोटीशी मदत ....

स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे का महत्त्वाचे?

स्वयंपाकघरात अन्नाचे कण, तेलकटपणा, ओलावा आणि कचरा साचल्यास जंतू, बुरशी आणि कीटक वाढण्याची शक्यता असते. यामुळे अन्न दूषित होऊन पोटाचे विकार, फूड पॉइझनिंग आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे.

घरातील सर्वात महत्त्वाच्या जागांपैकी एक म्हणजे स्वयंपाकघर. कुटुंबाच्या आरोग्याचा थेट संबंध किचनच्या स्वच्छतेशी असतो. मात्र रोजच्या धावपळीत किचनची सखोल स्वच्छता करणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे तेलाचे डाग, दुर्गंधी, किडे आणि जंतू वाढण्याचा धोका निर्माण होतो. काही सोप्या सवयी अंगीकारल्यास तुमचे किचन नेहमी स्वच्छ, सुगंधी आणि आकर्षक राहू शकते.

१. रोज ओटा आणि गॅस स्वच्छ करा

स्वयंपाक झाल्यानंतर गॅस स्टोव्ह आणि किचनचा ओटा त्वरित पुसून घ्या. अन्नाचे कण आणि तेलाचे डाग साचल्यास जंतू वाढू शकतात. कोमट पाण्यात लिक्विड क्लिनर मिसळून साफसफाई केल्यास चकाकी टिकून राहते.

२. सिंकची स्वच्छता विसरू नका

किचन सिंकमध्ये अन्नाचे अवशेष अडकून दुर्गंधी निर्माण होऊ शकते. रोज भांडी घासल्याने सिंक स्वच्छ दिसते पण पाईपमध्ये अन्नाचे कण साचून पाणी तुंबण्याची शक्यता असते. म्हणून  दररोज सिंक स्वच्छ धुवून आठवड्यातून एकदा बेकिंग सोडा आणि व्हिनेगरचा वापर केल्यास ड्रेनेजही स्वच्छ राहते.

३. फ्रिजची नियमित साफसफाई करा

फ्रिजमध्ये जुने अन्नपदार्थ किंवा सांडलेले पदार्थ राहिल्यास जीवाणू वाढू शकतात. दर १५ दिवसांनी फ्रिज रिकामा करून स्वच्छ करावा. खराब झालेल्या वस्तू त्वरित काढून टाकाव्यात.फ्रिजचे शेल्फ्स आणि ड्रॉवर्स काढून कोमट पाणी आणि डिश सोपने स्वच्छ धुवा. आतून फ्रिज पुसण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याचे मिश्रण वापरा जेणेकरून सर्व प्रकारची दुर्गंधी दूर होईल.

४. मसाल्यांचे डबे आणि कंटेनर स्वच्छ ठेवा

मसाल्याचे डबे आणि किराणा सामानाच्या डब्यामुळे कॅबिनेट्समध्ये कचरा साचतो आणि झुरळे होण्याची शक्यता असते. यासाठी सर्व डबे बाहेर काढून कॅबिनेट आतून ओल्या  पुसून घ्या. एक्स्पायरी झालेले किंवा खराब झालेले मसाले तपासून .फेकून द्या.  पारदर्शक डब्यांमध्ये वस्तू ठेवल्यास त्या सहज सापडतात आणि किचन अधिक नीटनेटके दिसते. बाहेरून कॅबिनेट्सचे दरवाजे साबणाच्या पाण्याने स्वच्छ करा जेणेकरून डाग आणि तेलकटपणा निघून जाईल.

५. एक्झॉस्ट फॅन आणि चिमणी साफ करा

चिमणी आणि एक्झॉस्ट फॅनवर तेलाचा थर जमा होतो. महिन्यातून किमान एकदा त्यांची स्वच्छता करणे गरजेचे आहे. त्यामुळे धूर कमी होतो आणि किचनमधील हवा ताजी राहते. यासाठी चिमणीचे फिल्टर्स काढून कडकडीत गरम पाण्यात बेकिंग सोडा आणि डिश वॉश लिक्विडच्या मिश्रणात १५-२० मिनिटे भिजवून साफ करा. तर एक्झॉस्ट फॅनची पाती  ओल्या स्पंजने काळजीपूर्वक पुसून घ्या.

६. कचरा वेळेवर बाहेर टाका

किचनमधील कचरा जास्त वेळ ठेवल्यास दुर्गंधी आणि कीटकांचा त्रास वाढू शकतो. कचरापेटी रोज रिकामी करून तीही धुवून स्वच्छ ठेवावी.

७. नैसर्गिक क्लिनरचा वापर करा

लिंबू, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा यांसारख्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करून किचनमधील अनेक डाग सहज काढता येतात. हे पर्यावरणपूरक आणि आरोग्यासाठीही सुरक्षित आहेत.

८. कीटकांपासून बचाव करा

किचनमध्ये अन्न उघडे ठेवू नका. सर्व खाद्यपदार्थ हवाबंद डब्यांमध्ये साठवा. नियमित साफसफाई केल्यास झुरळे, मुंग्या आणि इतर कीटकांपासून बचाव होतो.

किचन स्वच्छ ठेवण्याचे फायदे

✔️ कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते

✔️ अन्न दूषित होण्याचा धोका कमी होतो

✔️ किचन आकर्षक आणि नीटनेटके दिसते

✔️ कीटक आणि दुर्गंधीपासून संरक्षण मिळते

✔️ स्वयंपाक करताना सकारात्मक वातावरण निर्माण होते

Post a Comment

Previous Post Next Post