Type-C चार्जिंगसह फक्त ₹९४९ मध्ये उपलब्ध
मुंबई : अग्रगण्य टेक ब्रँड आयटेलने आपला नवीन फीचर फोन Ace 3 Heera भारतीय बाजारात लाँच केला आहे. Type-C चार्जिंगसह येणारा हा फोन फक्त ₹९४९ किंमतीत उपलब्ध असून, फीचर फोन वापरकर्त्यांना आधुनिक चार्जिंगचा अनुभव देण्याचा कंपनीचा उद्देश आहे. संपूर्ण फीचर फोन पोर्टफोलिओमध्ये Type-C चार्जिंग देणारा भारतातील पहिला ब्रँड असल्याचा दावा आयटेलने केला आहे.
Ace 3 Heera मध्ये 1000mAh बॅटरी, एआय बॅटरी ऑप्टिमायझेशन, सुपर बॅटरी मोड, ब्लूटूथ, ऑटो कॉल रेकॉर्डिंग, वायरलेस एफएम रेडिओ, 32GB पर्यंत मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट, किंग टॉकर व्हॉईस असिस्टंट आणि 200 कॉन्टॅक्ट्स सेव्ह करण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा फोन ब्लू, पर्पल आणि ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध असून, मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टवर एक वर्षाची काउंटर रिप्लेसमेंट ऑफरही देण्यात आली आहे.
आयटेल इंडियाचे सीईओ अरिजीत तालापात्रा यांनी सांगितले की, वेगवेगळ्या फोनसाठी वेगवेगळे चार्जर बाळगण्याची अडचण दूर करण्यासाठी कंपनीने फीचर फोनमध्ये Type-C चार्जिंगचा अवलंब केला आहे.
सायबर मीडिया रिसर्च (CMR) च्या अहवालानुसार, आयटेलला फीचर फोन आणि स्मार्टफोन विभागात ग्राहकांकडून टिकाऊपणा, विश्वासार्हता आणि किफायतशीरपणाबाबत चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कंपनीने नमूद केले आहे. Ace 3 Heera हा दैनंदिन वापरासाठी स्मार्ट, किफायतशीर आणि सोयीस्कर पर्याय ठरेल, असा कंपनीचा विश्वास आहे.
