ठाण्यात २१व्या मजल्यावरून पडून ७७ वर्षीय महिलेचा मृत्यू

 


ठाणे : ठाणे शहरातील माजिवडा परिसरात एका ७७ वर्षीय महिलेचा २१व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

ही घटना वसंत लॉन्स परिसरातील न्यू होरायझन स्कूलसमोर असलेल्या सवाना टॉवर या २३ मजली इमारतीत घडली. मृत महिलेचे नाव कुमुधा रमेश शेट्टी असे आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कुमुधा शेट्टी या इमारतीतील २१व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २१०१ मधील बाल्कनीत उभ्या असताना त्यांचा तोल गेला. त्यानंतर त्या खालील पॉडियमच्या छतावर कोसळल्या. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली आणि महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, नेमकी घटना कशी घडली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post