ठाणे : जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से) यांची बदली जिल्हाधिकारी, जळगाव या पदावर करण्यात आली असून, त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे (भा.प्र.से) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
दि. ८ ऑक्टोबर रोजी मध्यान्होत्तर रोहन घुगे यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून कार्यमुक्त होताना कार्यभार औपचारिकरित्या मनोज रानडे यांच्याकडे सोपविला.
यानंतर मनोज रानडे यांनी दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारनंतर ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला.
या प्रसंगी त्यांनी सांगितले की, ठाणे जिल्हा परिषदेची विकास वाटचाल अत्यंत सकारात्मक आहे. या वाटचालीला आणखी वेग देत नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनाचा ध्यास कायम ठेवू,असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर व अतिरिक्त कार्यभार, जिल्हा परिषद ठाणे मनोज रानडे यांनी केले.