पांडुरंगवाडीतील बेकायदेशीर इमारतीवर हातोडा

   



डोंबिवली : महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांचे निर्देशानुसार विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप, स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली 'ग' प्रभागाचे सहायक आयुक्त संजय साबळे यांनी डोंबिवली पूर्व पांडूरंग वाडी, रात्र निवारा केंद्रा जवळ  बांधकामधारक चेतन माळी यांच्या तळ + 8 मजली अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर हातोडा मारत कारवाई केली. 

कारवाई टिळकनगर स्टेशनचे पोलीस अधिकारी, महापालिका पोलीस कर्मचारी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे व फेरीवाला पथकाचे कर्मचारी यांच्या मदतीने आणि 3 कॉप्रेसर, 1 जेसीबी , 1 गॅस कटर सहाय्याने करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post