विजयी मालिका कायम राखण्यासाठी दोन्ही संघ सज्ज

पेरेझ याला खेळवण्याची घाई आम्हाला करायची नाही, त्याबाबतची काळजी घ्यावी लागणार आहे. पण, त्याचवेळी त्याने प्रत्येक सामना खेळावा असे मला वाटते, कारण तो चांगला फुटबॉलपटू आहे. तो अष्टपैलू खेळाडू आहे आणि तो क्लबमध्ये दाखल झाल्यापासून अथक मेहनत घेतोय,''असे ग्रेसन यांनी म्हटले  आहे. 

  • बंगळुरू एफसी विरुद्ध ईस्ट बंगाल एफसी 

कोलकाता: आठवड्याच्या ब्रेकनंतर ईस्ट बंगाल एफसी शुक्रवारी विवेकानंद युवा भारती क्रीडांगण स्टेडियमवर बंगळुरू एफसीचा सामना करणार आहे. हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल)च्या यंदाच्या पर्वात पहिल्या टप्प्यात ईस्ट बंगालने १-० अशा फरकाने बंगळुरू एफसीवर विजय मिळवला होता. हिच विजयी मालिका कायम राखण्याचा ईस्ट बंगालचा प्रयत्न असणार आहे. दोन्ही संघ प्ले ऑफच्या शर्यतीत अशा स्थानावर आहेत की जेथे प्रत्येक निकाल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बंगळुरू एफसी १० गुणांसह आठव्या, तर ईस्ट बंगाल एफसी ९ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे आणि त्यांना प्ले ऑफमधील सहावे स्थान पटकावण्याची अजूनही संधी आहे.  

दोन आठवड्यापूर्वी हिरो आयएसएलमधील लढतीत मुंबई सिटी एफसीने ३-० अशा फरकाने  ईस्ट बंगाल एफसीला पराभूत केले होते आणि सलग दोन सामन्यांत ईस्ट बंगालला गोल करण्यात अपयश आले. या पर्वाच्या सुरुवातीला स्टीफन कॉन्स्टन्टाईन यांच्या संघाला सलग दोन सामन्यांत गोल करता आले नव्हते, परंतु बंगळुरू एफसीवर त्यांनी विजय  मिळवला होता. त्यामुळे तोच निकाल पुन्हा लावण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. संघाची कामगिरी समाधानकारक झाली नसली तरी सुहैर व्हीपी आणि महेश सिंग यांनी उल्लेखनीय खेळ केला आहे. या दोघांनी मिळून १० गोलसाठी सहाय्य केले आहेत. क्लेईटन सिल्वाने क्लबकडून  सर्वाधिक ५ गोल केले आहेत आणि बंगळुरू एफसीविरुद्ध त्याने विजयी गोल केला होता. उद्याच्या सामन्यात त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

प्रतिस्पर्धीप्रमाणे बंगळुरू एफसीलाही मागील सामन्यात हैदराबाद एफसीकडून ३-० असा पराभव पत्करावा लागला आहे.  हा त्यांचा यंदाच्या पर्वातील सातवा पराभव ठरला. सिमॉन ग्रेसन यांच्या संघाला सुरुवातीच्या सहा सामन्यांत केवळ एक विजय मिळवता आला होता. पण, ईस्ट बंगालचा घरच्या मैदानावरील रेकॉर्ड अत्यंत खराब आहे आणि त्यांना यंदाच्या पर्वात घरच्या प्रेक्षकांसमोर चारही सामने गमवावे लागले आहेत. पाब्लो पेरेज हा तंदुरुस्त झाला असून ग्रेसन त्याला स्टार्टिंग इलेव्हन मध्ये खेळवू शकतात. स्पॅनिशच्या या खेळाडूला आतापर्यंत एकही सामन्यात सुरुवातीपासून खेळण्याची संधी मिळालेली नाही. तो बदली खेळाडू म्हणूनच मैदानावर उतरला आहे.  

उभय संघांमध्ये पाच सामने झाले आहेत आणि दोघांनीही प्रत्येकी दोन विजय मिळवले आहेत. एक सामना अनिर्णित सुटला आहे. 

तीन गुण हेच आमचे लक्ष्य आहे. प्रत्येक सामन्यात हेच ध्येय असेल. आता पुढे होणारा प्रत्येक सामना आम्हाला जिंकायचा आहे आणि त्यात विशेष असे काही नाही. आम्ही लढू आणि जिंकू. दहा सामन्यांत तीन विजयही कामगिरी समाधानकारक नक्की नाही. पणआम्ही खेळात सातत्याने सुधारणा करत आहोत आणि खेळाडूही अथक मेहनत घेत आहेत. आम्हाला फक्त संयम बाळगायचा आहेकारण आमची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे,'' असे कॉन्स्टन्टाईन यांनी म्हटले  आहे. 

 


Post a Comment

Previous Post Next Post