- ३२वी किशोर/ किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा- झारखंड- २०२२
झारखंड: झारखंड राज्य कबड्डी असो. ने आयोजित केलेल्या ३२व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांचा संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला. बोकारो येथील एम जी एम हायर सेकंडरी शाळेच्या पटांगणावर सुरू असलेल्या किशोर गटाच्या उपांत्य सामन्यात बिहारने महाराष्ट्राचे आव्हान ४६-३६ असे संपविले. सुरुवातीपासून सामन्यावर वर्चस्व राखणाऱ्या बिहारने विश्रांतीला २३-१८ अशी आघाडी राखली होती. विश्रांतीनंतर महाराष्ट्राच्या संदेश बिल्ले, श्रीधर कदम यांनी चतुरस्त्र खेळ करीत बिहारची आघाडी २गुणापर्यंत कमी करीत आणली होती. त्यांना सारंग रोकडे यांनी उत्तम पकडी करीत छान साथ दिली. पण त्यांचे हे प्रयत्न महाराष्ट्राला विजयी करण्यात कमी पडले.