विबग्योर हायस्कूलचा राबोडी स्कूलवर शानदार विजय


  • एमआय ज्युनिअर आंतरशालेय स्पर्धा
  • ऑफस्पिनर ईशान संघाईच्या 8 विकेट 
  • विबग्योर हायस्कूलची 7 विकेट राखून विजयी सलामी

मुंबई:  क्रॉस मैदानावर सुरू असलेल्या एमआय ज्युनिअर आंतशालेय क्रिकेट स्पर्धेत 14 वर्षांखालील मुले गटात ऑफस्पिनर ईशान संघाईच्या (9 धावांत 8 विकेट) अचूक मार्‍याच्या जोरावर सरस्वती स्कूल, राबोडी स्कूलवर 7 विकेट राखून मात करताना विबग्योर हायस्कूल, गोरेगाव संघाने विजयी सलामी दिली. 

ईशानच्या प्रभावी गोलंदाजीसमोर सरस्वती स्कूलचा डाव 86 धावांमध्ये आटोपला. त्यानंतर माफक आव्हान 3 विकेटच्या बदल्यात 12 षटकांत पार केले. त्यात समर्थ सराफचे (नाबाद 34 धावा) सर्वाधिक योगदान राहिले. 16 वर्षांखालील मुले गटात अनिरुद्ध नायरच्या 105 धावांच्या शतकी खेळीमुळे आयईएस व्ही. एन. सुळे (दादर) संघाने छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूल, विलेपार्लेविरुद्ध 34 षटकांत 7 बाद 403 अशी मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर प्रतिस्पर्ध्यांना 84 धावांत रोखताना व्ही. एन. सुळे संघाने मोटा विजय साकारला. अंशुल मोर्जे याने 4 विकेट घेत विजयाला हातभार लावला. 

मुलींच्या 15 वर्षांखालील गटात शारदाश्रम विद्यामंदिरने एसव्हीकेएम जेव्ही पारेख इंटरनॅशनल स्कूलवर 10 विकेटनी मात केली. त्यात मुग्धा घोडके (3 विकेट) आणि सरथी भाकरे यांची (4 विकेट) भेदक गोलंदाजी त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.


संक्षिप्त धावफलक: 14 वर्षांखालील मुले गट: सरस्वती राबोडी-23 षटकांत सर्वबाद 86( मृगेश भोसले 33, ईशान संघाई 8-9) पराभूत वि. विबग्योर हायस्कूल, गोरेगाव-12 षटकांत 3 बाद 87(समर्थ सराफ नाबाद 34, श्रीराज सारंग 2-26). 

ऑल सेंट्स हायस्कूल, भिवंडी-31.3 षटकांत सर्वबाद 155(उत्कर्ष सिंग 56, विहान सेठ 3-25) पराभूत वि. बॉम्बे स्कॉटिश, माहिम-26.1 षटकांत 3 बाद 156(आरव ठाकेर, अष्ठांग खानोलकर नाबाद 40, जय वामने 2-41).

अमुलख अमिचंद इंटरनॅशनल स्कूल, माटुंगा-38 षटकांत सर्वबाद 146(ध्रुव राजवत 43, मन्न्त जोशी 34, राजीव दुबे 5-38) पराभूत वि. छत्रभुज नरसी स्कूल, कांंदिवली-23.1 षटकांत 2 बाद 147(आरव भाटिया नाबाद 52, व्योम पंजाबी 27).

14 वर्षांखालील मुले गट: पराग इंग्लिश स्कूल, भांडूप-28.्र षटकांत सर्वबाद 101(अभिनव शर्मा 19, क्रिश यादव 4-21) पराभूत वि. कृष्णा मेनन अ‍ॅकॅडमी, बोरीवली-19.3 षटकांत 3 बाद 102(आरव जोशी नाबाद 61, रोहन करंदीकर 2-23). 

नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल, भिवंडी-29.1 षटकांत सर्वबाद 73(योशिल 17, प्रणय पाटील 3-10, दर्श शाह 3-14) पराभूत वि. द स्कॉलर्स इंग्लिश हायस्कूल, भिवंडी-17.1 षटकांत 3 बाद 74(सिद्धेश वरकुटे नाबाद 32).

सेंट झेवियर्स हायस्कूल, मीरा रोड-25.2 षटकांत सर्वबाद 109(करन सिंग 25, आदित्य मिस्त्री 22, श्लोक विचारे 4-25, उत्कर्ष झोरे 3-18) पराभूत वि. ऑक्सफर्ड स्कूल, कांदिवली-7 षटकांत बिनबाद 110(केसर उपाध्याय नाबाद 51, भविष्य गायकवाड नाबाद 44).

एसआयडब्लूएस हायस्कूल, वडाळा-13.4 षटकांत सर्वबाद 88(झुबेर देशमुख 25, यासिर खान 8-47) पराभूत वि. सेंट स्टॅनिस्लास हायस्कूल, वांद्र-6.5 षटकांत 1बाद 92(अर्जुन जैस्वाल 37, आर्यन सेठी नाबाद 30). 

15 वर्षांखालील मुली गट: छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूल-9 बाद 66(अद्वैता तोरसकर 2-4, स्पार्कल लोपेस 2-7, मैथिली सकपाळ 2-11) पराभूत वि. सेंट कोलंबा स्कूल - 6.1 षटकांत बिनबाद 67(निर्मिती यादव नाबाद 30, आर्या वाजगे नाबाद 23).

एसकेव्हीएम जेव्ही पारेख इंटरनॅशनल स्कूल - 13 षटकांत सर्वबाद 36(सारथी भाकरे 4-5, मुग्धा घोडके 3-10) पराभूत वि. शारदाश्रम विद्यामंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल-बिनबाद 37(ईरा नाबाद 19).


Post a Comment

Previous Post Next Post