- ३२ वी किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा-झारखंड-२०२२
झारखंड : महाराष्ट्राच्या मुलांनी फ गटात विजयी सलामी देताना तामिळनाडूला ४१-४० असे चकविले. झारखंड राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने बोकारो येथील एम जी एम हायर सेकंडरी शाळेच्या क्रीडांगणावर "३२व्या किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेला" सुरूवात झाली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावेधक ठरलेल्या या सामन्यात मध्यांतराला महाराष्ट्र २२-२६ असा ४गुणांनी पिछाडीवर पडला होता. उत्तरार्धात टॉप गिअर टाकत महाराष्ट्राने तामिळनाडूच्या घशातून सामना खेचून आणला. तामिळनाडूची शेवटची चढाई असताना महाराष्ट्र ४१-३८ असे आघाडीवर होते. पण त्या चढाईत महाराष्ट्राचे दोन खेळाडू बाद झाल्याने महाराष्ट्राला एका गुणांच्या फरकावर समाधान मानावे लागले. संदेश बिल्ले, श्रीधर कदम, दिघु दहातोंडे यांनी उत्तरार्धाच्या खेळात केलेल्या झंजावाती चढयामुळे महाराष्ट्राने हा विजय साकारला. त्यांना विजय तारे यांनी भक्कम बचाव करीत उत्तम साथ दिली.
महाराष्ट्राच्या फ गटात तमिळनाडूसह, त्रिपुरा, पंजाब हे अन्य संघ आहेत. किशोरी फ गटात उत्तराखंड, मध्य प्रदेश, कर्नाटका यांच्याशी महाराष्ट्राची साखळी लढत होणार आहे.