नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत याच्या गाडीचा शुक्रवारी पहाटे रुरकी परिसरात भीषण अपघात झाला. ऋषभ पंत आपल्या मित्रांसोबत दिल्लीहून रुरकीला येत असताना ही दुर्घटना घडली. हा अपघात भीषण स्वरुपाचा होता. ऋषभ पंतची गाडी दुभाजकावर जोरात आदळली, त्यानंतर गाडीला आग लागली. ऋषभ पंतच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर देहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडहून दिल्लीला जात होता. अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला. हे सगळी दृश्यं रस्त्यावर लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
