'बोट'ची गुगल जेमिनीसह भागीदारी



एआय-सज्ज स्मार्ट ऑडिओ उपकरणांच्या नव्या युगाचा प्रारंभ 

मुंबई : भारतातील अव्वल ऑडिओ आणि वेअरेबल्स ब्रँड 'बोट'ची (boAt) मूळ कंपनी 'इमेजिन मार्केटिंग' आणि 'गूगल क्लाउड' यांनी एकत्र येत, त्यांच्या पुढील पिढीच्या क्रेस्ट एआय (Crest AI) स्मार्ट ऑडिओ उपकरणांच्या श्रेणीमध्ये गुगल जेमिनीद्वारे विकसित केलेली एआय-फर्स्ट वैशिष्ट्ये समाविष्ट करण्याची घोषणा केली आहे.

'क्रेस्ट एआय' हे पुढील पिढीच्या ऑडिओ उपकरणांसाठी बोटचे एआय-संचालित प्लॅटफॉर्म आहे, जे संवादपर, व्हॉईस-ड्रिव्हन आणि वैयक्तिक अनुभव देण्यासाठी गुगल जेमिनीच्या आधारे विकसित केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची अत्यंत तत्पर एआयशी सांगड घालून क्रेस्ट एआय प्लॅटफॉर्म एआय इनोव्हेशन आणि दैनंदिन उपयुक्तता एका नव्या उंचीवर नेतो. ग्राहकांच्या उपकरणांशी होणाऱ्या संवादाची व्याख्या बदलण्यासाठी डिझाइन केलेले 'जेमिनी लाईव्ह'चे हे एकत्रीकरण अत्यंत वैयक्तिक, व्हॉईस-ड्रिव्हन अनुभव सक्षम करेल. ग्राहक त्यांच्या क्रेस्ट एआय-संचालित उपकरणांशी नैसर्गिक आणि सहज संवाद साधू शकतील, ज्यामुळे पारंपारिक हार्डवेअर आणि ॲम्बीएंट एआय कॉम्प्युटिंगमधील अंतर दूर होईल.

या सहकार्याचा मुख्य उद्देश भारतातील विविध बोलीभाषांमधील लाखो ग्राहकांना प्रीमियम एआय वैशिष्ट्ये सहज उपलब्ध करून देणे हा आहे. गूगल क्लाउडची मजबूत पायाभूत सुविधा आणि 'जेमिनी एंटरप्राइज एजंट प्लॅटफॉर्म' वरील 'जेमिनी लाईव्ह'च्या बहुआयामी क्षमतांचा वापर करून, बोटची क्रेस्ट एआय उपकरणे एक बुद्धिमान सोबती म्हणून काम करतील, जी प्रादेशिक भाषेतील बारकावे, संदर्भ आणि जटिल प्रश्न रिअल-टाइममध्ये समजून घेण्यास सक्षम असतील.

बोटचे सह-संस्थापक आणि कार्यकारी संचालक समीर मेहता यांनी सांगितले की , "संवाद साधण्यासाठी 'आवाज' हे मानवासाठी सर्वात नैसर्गिक माध्यम आहे आणि एआयसोबत परस्परसंवाद करण्यासाठी देखील हेच सर्वात नैसर्गिक माध्यम बनेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. 'बोट'मध्ये आमच्याकडे एक अनोखी संधी उपलब्ध आहे, कारण आमची लाखो उपकरणे आधीच लोकांच्या कानात (वापरात) आहेत. 'क्रेस्ट एआय' च्या माध्यमातून उपयुक्त एआय अनुभव थेट या उपकरणांपर्यंत पोहोचवणे आणि ते परवडणाऱ्या तसेच रोजच्या जीवनाचा भाग असलेल्या उपकरणांद्वारे लाखो ग्राहकांसाठी सुलभ करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हे आमचे पहिले पाऊल आहे आणि जसे जसे आम्ही शिकू व नवीन निर्मिती करू, तसतसा हा अनुभव अधिक समृद्ध आणि सक्षम करत राहू."



बोटचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव नय्यर म्हणाले, "बोटमध्ये आमचे ध्येय नेहमीच काहीतरी धाडसी व प्रभावी निर्माण करण्याचे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वांसाठी सुलभ करण्याचे राहिले आहे. आमच्या क्रेस्ट एआय उपकरणांमध्ये गूगलचे जेमिनी इंटिग्रेट करून, आम्ही एक मोठी झेप घेत आहोत. आम्ही सामान्य व्हॉईस असिस्टंटच्या पुढे जाऊन सामान्य व्हॉईस क्वेरीज, डिव्हाइस कंट्रोल, म्युझिक प्लेबॅक, उत्पादकता, भाषा भाषांतर आणि एफएक्यू सहाय्यासाठी बुद्धिमान, संवादात्मक एजंट्स तयार करत आहोत. गूगल क्लाउडसोबतची ही भागीदारी आम्हाला हा दृष्टिकोन अधिक व्यापक करण्यास आणि भारत तसेच जागतिक स्तरावर ॲम्बीएंट कॉम्प्युटिंगच्या भविष्याला नवी दिशा देण्यास मदत करेल."

क्रेस्ट एआय उपकरणे गुगल वर्कस्पेसशी देखील जोडली जातील, ज्यामुळे बोट ऑडिओ उपकरणे हँड्स-फ्री प्रॉडक्टिव्हिटी सोबत्यांमध्ये रूपांतरित होतील; जे वापरकर्त्यांना केवळ आवाजाद्वारे त्यांचे जीमेल, गुगल टास्क्स आणि गुगल कॅलेंडर व्यवस्थापित करण्यास सक्षम करतील. 'क्रेस्ट ट्रान्सलेट' हे रिअल-टाइम, दुतर्फा भाषांतर सक्षम करते जेणेकरून वापरकर्त्यांना विविध भाषांमध्ये संवाद साधण्यास मदत होईल. तर 'क्रेस्ट आस्क' दैनंदिन श्रवणात संवादात्मक बुद्धिमत्ता आणते, ज्यामुळे संदर्भ समजून घेणारे नैसर्गिक संवाद शक्य होतात आणि वापरकर्त्यांना शिकण्यास, नवीन कल्पना सुचण्यास, प्रश्न विचारण्यास किंवा सहज संवाद साधण्यास मदत होते. उदाहरणार्थ, जीमेल आणि गुगल कॅलेंडरच्या एकत्रीकरणाद्वारे, वापरकर्ता "मला त्या ईमेलला उत्तर देण्यास मदत करा" किंवा "माझ्यासाठी मीटिंग शेड्यूल करा" असे व्हॉईस कमांड देऊ शकतो.

गूगल क्लाउड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक शशी श्रीधरन म्हणाले, "बोट हा भारतातील अग्रगण्य वेअरेबल ब्रँड्सपैकी एक आहे आणि ग्राहकांपर्यंत अत्याधुनिक एआय पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न हा असाच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे ज्याला आम्ही पाठिंबा देऊ इच्छितो. आवाज आणि प्रादेशिक भाषा ही भारतातील एआयची पुढील सीमा आहे आणि जेमिनी लाईव्ह हे शक्य करण्यास मदत करते. गूगल क्लाउडच्या पायाभूत सुविधांच्या आधारे, बोट संपूर्ण भारतातील लाखो वापरकर्त्यांपर्यंत याचा विस्तार करू शकते."



Post a Comment

Previous Post Next Post