महावितरणच्या Power up अँपवर चार्जिंग स्टेशन शोधता येईल
भांडूप : वाढते नागरीकरण व औद्योगीकरणामुळे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनाची संख्या दिवसगणित वाढत आहे. त्यातून प्रदूषणाचे दृष्टचक्र पर्यावरणभोवती आवळले जात आहे. वाहन निर्मित प्रदुषणाने अनेक शहरांमध्ये धोक्याची पटली ओलांडली आहे. दळणवळणाच्या साधनाने विद्युतीकरणामध्ये रुपांतर केल्यास एका वाहनामागे अंदाजे ४.६ मेट्रिक टन कार्बनचे उत्सर्जन कमी होऊ शकते. केंद्र शासनाने नेशनल मोबिलिटी मिशन २०२० केले आहे. महाराष्ट्र शासनाने देखील इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता विचारात घेऊन व इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक धोरण आणले आहेत.
या धोरणाला हातभार लावण्यासाठी महावितरणने राज्यातील विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले आहे. ग्राहकांनी आपल्या मोबाईलमध्ये महावितरणचे Power up अँप इन्स्टॉल करून MSEDCL चा पर्याय निवडावा. चार्जिंग स्टेशन महावितरणच्या मोबाईलअँप वर शोधणे अतिशय सोपे आहे. हे सर्व चार्जिंग स्टेशन रस्त्याच्या लगत असल्यामुळे ग्राहकांपरिमंडलाचे मुकी ना वाहन आत मधल्या रस्त्यावर नेण्याची काळजी करायची गरज नाही. चार्जिंग स्टेशनच्या प्रांगणात वाहनांच्या चाचणीसाठी सोय उपलब्ध आहे. एका किलो व्हँटसाठी इतर चार्जिंग स्टेशन पेक्षा कमी दर आहेत. तरी, महावितरणच्या वाशी मंडलातील ग्राहकांनी या चार्जिंग स्टेशनचा लाभ घ्यावा असे आवाहन वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांनी केले आहे. या कामाबद्दल भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी वाशी मंडळातील कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
12 ठिकाणी चार्जिंग स्टेशन
महावितरणच्या मंडळात १२ नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात आले आहेत. सदर चार्जिंग स्टेशन वाशी येथील रघुलीला मॉल, सेक्टर ३० उपकेंद्र, वाशी रेल्वे स्थानक जवळ, सेक्टर २ खारघर उपकेंद्र, सेक्टर १९ई उपकेंद्र, गेलेरीया मॉल जवळ, पामबीच रोड, सेक्टर १५ उपकेंद्र, एरोली उपकेंद्र, पावणे MIDC, सेक्टर ८ रबाळे MIDC उपकेंद्र, इंदिरा नगर उपकेंद्र, सेंट्रलरोड, ल्युब्रीआँल कंपनी जवळ, तुर्भे नवी मुंबई, टपाल लाका उपकेंद्र, पनवेल – उरण रोड, टपाल नाका, पनवेल, सेक्टर ५० सिवूड, नवी मुंबई, सेक्टर ९ पामबिच उपकेंद्र, नेरूळ, नवी मुंबई, सेक्टर १५, सीबीडी उपकेंद्र, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, पुढारी उपकेंद्र आहे.
