नाशिक जिल्ह्यात धम्म पदयात्रेचे आगमन


नाशिक :  परभणी ते चैत्यभूमी (दादर) अशी निघालेली तथागत गौतम बुद्ध अस्थिकलश पदयात्रा नाशिक जिल्ह्यातील अंदरसूल येथे दाखल झाली. यावेळी तथागत गौतम बुद्ध अस्थिकलश रथासोबत थायलंड येथील ११० भंते आणि महाराष्ट्रातील उपासक सामील झाले होते. या यात्रेचे सोमवार दि. ६ फेब्रुवारी (सोमवार) रोजी नाशिक येथे आगमन होणार आहे.

यानिमित्ताने नाशिक जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी अनु.जाती विभागाचे प्रांताध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, उपाध्यक्ष प्रशांत पवार यांचे स्वागत केले. या यात्रेचे संयोजक आणि म.प्र.काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे प्रांताध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, टीव्ही मालिका अभिनेते गगन मलिक  प्रशांत पवार (उपाध्यक्ष,म. प्र. काँग्रेस कमिटी अनु.जाती विभाग ), ज्ञानेश्वर काळे  (नाशिक जिल्हाध्यक्ष), जिल्हा सरचिटणीस मनोहर आहिरे, ज्येष्ठ समाजसेवक मोहन अढांगळे आदी मान्यवर यात्रेत सामिल झाले होते.


Post a Comment

Previous Post Next Post