कल्याणमध्ये अजित पवार यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन

 

कल्याण :   राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते ते स्वराज्यरक्षक होते, असे विधान केले. त्यामुळे राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. 

अजित पवारांनी संभाजीराजेंविषयी केलेल्या विधानाविरोधात भाजप व शिंदे गटानेदेखील रान पेटवायला सुरुवात केली आहे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीसह भाजपच्या नेत्यांकडून ठिकठिकाणी आंदोलनाद्वारे निषेध नोंदविला जात आहे. तसेच कल्याण येते कल्याण जिल्हा महिला मोर्चा महिला अध्यक्षा रेखा चौधरी यांचे नेतृत्वाखाली शिवाजी चौक येथे महिलांचा अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही भाजपकडून यावेळी करण्यात आली.

बाईट : - रेखा चौधरी ( माजी नगरसेविका भाजप )

Post a Comment

Previous Post Next Post