गवळी समाजाच्या नवनिर्वाचित सरपांचांचा सत्कार

 

महाड: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या गवळी समाजाच्या सरपंचांचा सत्कार महाराष्ट्र यादव च्यारीटी ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. 

ग्रामपंचायतीमध्ये घवघवीत यश मिळवून आपल्या समाजाचे नाव उज्वल करणाऱ्या या उमेदवारांना त्यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट देन्यात आले. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

महाड तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच अर्चना अनिल काते - उंदेरी, भारती सुनील महाडिक - करंजखोल, आशिष  अशोक खताते - गोंडाळे, वैशाली संदीप पाटील - कोळोसे, अलका तुकाराम चिले - नांदगाव यांचे अभिनंदन करताना महाराष्ट्रीय यादव चारिटी ट्रस्ट या संस्थेचे विश्वस्त उदय दगडू पाटील, महाड - पोलादपूर तालुका शाखा मुंबई कार्यकारिणीचे  शाखाकार्याध्यक्ष विश्वास महाडिक, सुभाष चौगुले, स्थानिक कार्यकारणीचे सरचिटणीस सुशांत चिले, खजिनदार संदीप तांबडे, अविनाश चिले, नथुबुवा दिवेकर, डॉ.परेश महाडिक, गिरीश गायकर आदी हजर होते.

Post a Comment

Previous Post Next Post