बेस्ट वीज ग्राहकांसाठी अतिरिक्त वीज भरणा केंद्रे

 


मुंबई : वीज ग्राहकांना वीजदेयकाचे प्रदान सोयीस्कर व्हावे, या हेतूने बेस्ट उपक्रमाने मुंबईतील २०१ ठिकाणी विविध बँकाच्या माध्यमातून अतिरिक्त वीजदेयक भरणा केंद्रे सुरु केली आहेत. त्यात  ठाणे जनता सहकारी बँकेच्या ५५ शाखांमधून, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ठिकाणी तसेच कोटक महेंद्र शाखेच्या ३४ शाखांमधून अंतर्गत असलेल्या बँकाच्या ५२ शाखांमधून भारत देयक प्रदान प्रणालीच्या (बी बी पी एस ) येस बँकेच्या १५ शाखांमधून आणि इंडस इंड बँकेच्या ०३ शाखांमधून यापुढे बेस्टचे वीजदेयक  त्यांच्या सर्व शाखांमधून स्वीकारले जाणार आहे . सदर वीज देयक भरणा केंद्रांच्या ठिकाणांची यादी बेस्ट उपक्रमाच्या  वेबसाईटवर  उपलब्ध करून दिली आहे . 

        जास्त ठिकाणी वीजदेयक स्वीकारण्याची सोया केल्यामुळे वीजग्राहकांना   त्यांच्या घराजवळील किंवा कार्यालया नजिकच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या सोयीने वीजदेयकाचे प्रदान करुन त्यांच्या वेळेची बचत करु शकणार आहेत  . तसेच बेस्टच्या इतर सुविधेचा लाभ घेतल्याने  व  ऑनलाईन पध्दतीने देखील वीजदेयकांचे प्रदान करुन वीजग्राहक प्रोत्साहनपर रकमेचा लाभ घेऊ शकणार आहेत  . त्याचबरोबर सदर ठिकाणी बेस्ट उपक्रमाच्या वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव देखील भरता येणार आहे .

Post a Comment

Previous Post Next Post