उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर एकत्र


 ठाकरे गट-वंचितच्या युतीची घोषणा 

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले आहे. असे असतानाच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली आहे. सोमवारी दुपारी या दोन्ही नेत्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली आहे. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीमुळे निवडणुकांमध्ये आता बदलाचे वातावरण सुरू होणार आहे."

नव्या युतीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्हाला काल स्वप्न पडले आणि आज एकत्र आलो असे नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांच्याशी चर्चा केली आहे. सध्या ही व्यक्तीगत युती असली तरी प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचा घटक व्हावा अशी इच्छा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. तसेच देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येत आहोत. पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, याविषयी विचारविनिमय करून आम्ही पुढे जाऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  शिवशक्ती आणि भिमशक्तीचा प्रयोग याआधी झाला होता. पण प्रकाश आंबेडकर आणि मी पहिल्यांदाच या वास्तूमध्ये एकत्र आलो आहे. पुढे एकत्रित चालण्यासाठी एकत्र येतोय असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 

"गेली अनेक वर्षे उपेक्षितांचे राजकारण अशी चळवळ अमलात आणण्याचा प्रयत्न आमचा होता. पण आमच्याच मित्र पक्षाने ही चळवळ गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला किंवा मर्यादित करण्याचा प्रयत्न केला असे सांगत, आपण कोणीही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही. सर्वांचा अंत होणार आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींचाही एक दिवस अंत होणार आहे. त्याचबरोबर मोदी यांनी त्यांच्या पक्षातील लीडरशीप संपवली असेही आंबेडकर यांनी सांगितले.

मी शरद पवार आणि आंबेडकर यांचे संबंध सुधारतील यांचा निश्चितपणे मी प्रयत्न करेन.






मी शरद पवार यांची प्रतिक्रिया वाचली आहे. ही प्रतिक्रिया नवीन नाही. आमच्या दोघांचे भांडण फार जुने आहे. हे शेतातले भांडण नाही, नेतृत्वातील भांडण आहे, दिशेचे 8भांडण आहे. ते आमच्याबरोबर येतील अशी आशा मी बाळगतो. कारण या लढ्याकडे मी वेगळ्या दृष्टीने बघतो.



 


Post a Comment

Previous Post Next Post