- चोरी करणाऱ्या महिलेसह एकास अटक
डोंबिवली : फेसबुकचे माध्यमातून मैत्री करून हॉटेलमध्ये बोलावून गुंतवून चोरी करणाऱ्या महिलेला मानपाडा पोलिसांनी अटक करून गजाआड केले.विशेष म्हणजे या महिलेने फिर्यादीची परवानाधारक रिव्हॉल्व्हर आणि सोन्याची चैन, घड्याळ असा एकूण ४,७५,००० रुपयांचा ऐवज चोरला होता.तसेच अनेकांकडून चोरी करून मिळवलेला २० लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.पोलिसांनी महिलेस एकास अटक केली.
पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, समृध्दी खडपकर असे संशयित महिला व विलेंडर विल्फड डिकोस्टा ( ३४ ) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.सदर महिला चोरीचा माल साथीदाराला दिल्यानंतर तो या वस्तू बाजारात विकायचा.२१ डिसेंबर रोजी फिर्यादी महेश कृष्णा पाटील यांच्याशी सदर महिलेने फेसबुकच्या माध्यमातून ओळख करून मैत्री केली.फिर्यादीला महिलेने डोंबिवली जवळील खोणीगांव येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यास बोलाविले. हॉटेलमध्ये महिलेने फिर्यादिला बोलण्यात गुंतवुण प्रेम करते असे दाखवुन त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेने हॉटेलमधील लॉजच्या खोलीत घेऊन गेली.खोलीत गेल्यानंतर फिर्यादी बाथरुममध्ये गेल्याची संधी घेत महिलेने फिर्यादी यांचे परवानाधारक रिव्हॉल्व्हर सॅमसंग फोल्ड-३ मोबाईल, सोन्याच्या तीन चैन, सोन्याचे घडयाळ असा ४,७५,००० रुपयांचाचा ऐवज घेवुन तेथुन पळुन गेली.चोरी झाल्याचे दिसताच फिर्यादीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.फिर्यादी यांची परवानाधारक रिव्हॉल्व्हरचा सदर महिला गैरवापर करण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तपास सुरु केला.वपोनि शेखर बागडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार महिलेचे फेसबुक अकाउंट तपासण्यात आले.
सदर महिलेवर डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात भादंंविक ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन सदर महिला ही मुंबईतील खार परिसरात राहत असलायचे समजले.या पत्यावर तिचा शोध घेतला असता, ती गोवा राज्यात रहावयास गेल्याची माहिती मिळाली.पोलीस गोवा येथे सदर महिलेचा शोध घेतला असता तो गोवा राज्यातील जिल्हा बारटेज येथील पेड म्हापसा येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी जाऊन तिला अटक केली. पोलिसांनी सदर महिलेकडे चौकशी तिने फेसबुकचे माध्यमातून अनेक लोकांना संपर्क साधून त्यांचेकडील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन वस्तु चोरी करुन पळुन गेली होती.पोलिसांनी अटक केलेल्या दोघांकडील २० लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि शेखर बागडे, सपोनि. अविनाश वणवे, सुनिल तारमळे, पोलीस हवालदार सुशांत तांबे,सुनिल पवार,राजेंद्रकुमार खिलारे, दीपक गडगे,विकास माळी,पोलीस नाईक शांताराम कसबे,यलप्पा पाटील,देवा पवार,प्रविण किनरे, पोलीस शिपाई बालाजी गरुड,मपोहवालदार अरुणा चव्हाण, मपोना प्राजक्ता खरनार यांचे पथकाने कामगिरी केली.

