- हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३
कोची : हिरो इंडियन सुपर लीग २०२२-२३ ( आयएसएल) मध्ये केरळा ब्लास्टर्स एफसी मंगळवारी घरच्या मैदानावर जमशेदपूर एफसीचा सामना करणार आहे. केरळा ब्लास्टर्स तालिकेत चौथ्या क्रमांकावर आहेत, तर जमशेदपूर दहाव्या क्रमांकावर आहेत. केरळा ब्लास्टर्सला घरच्या मैदानावर हा सामना जिंकून अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या हैदराबाद एफसी आणि त्यांच्यातील गुणफरक कमी करण्याची संधी आहे.दोन्ही संघ सकारात्मक निकालाची नोंद करून उद्या मैदानावर उतरतील. केरळा ब्लास्टर्सला मागील सामन्यात संदीप सिंगने ८६व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर ओडिशा एफसीवर विजय मिळवता आला होता. जमशेदपूर एफसीनेही चुरशीच्या सामन्यात एफसी गोवाला २-२ असे बरोबरीत रोखून ७ सामन्यानंतर पहिल्या गुणाची नोंद केली होती.
केरळा ब्लास्टर्सच्या खेळाडूंनी यंदाच्या पर्वात सर्व आघाडीवर चांगला खेळ केला आहे. एड्रीयन लुना फॉर्मात परतला आहे आणि त्याने दोन गोल केले आहेत व तीन गोलसाठी सहाय्य केले आहेत. इव्हान कलियुझनीनेही चार गोल केले आहेत आणि एक गोलसाठी सहाय्य केले आहे. दिमित्रिओस डिएमांटाकोसनेही पाच गोल व २ गोल सहाय्य केले आहेत.
जमशेदपूर एफसीनेही मागील सामन्यात कडवी टक्कर दिली, परंतु त्यांना या पर्वात आतापर्यंत केवळ ८ गोल करता आले आहेत. मुख्य प्रशिक्षक एडी बूथ्रॉयड यांनी एफसी गोवाविरुद्ध रणनीतीत बदल केला होता आणि त्यांच्या खेळाडूंच्या कामगिरीतही सुधारणा होत आहे. मागील सामन्यात इकर गौरोत्क्सेनाने ९०व्या मिनिटाला गोल करून एफसी गोवाला २-२ अशा बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले होते. त्यामुळे बूथ्रॉयड याच संघासह मैदानावर उतरणे पसंत करतील.
बूथ्रॉयड यांनी जानेवारीच्या विंडोत काही नवीन खेळाडूंना संघात घेण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले,'आता नवीन खेळाडू येणार आहेत आणि आम्हाला काहींची गरज आहे. जेव्हा अव्वल दर्जाचा गोल करणारा खेळाडू गमावतो तेव्हा समस्या निर्माण होते.'
उभय संघ हिरो आयएसएलमध्ये १३ वेळा समोरासमोर आले आहेत आणि त्यापैकी ७ सामने अनिर्णित राहिले आहेत, तर दोघांनी प्रत्येकी ३ विजय मिळवले आहेत. हिरो आयएसएलच्या यंदाच्या पर्वातील पहिल्या टप्प्यात केरळा ब्लास्टर्सने डिएमांटाकोसने १७ व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर १-० असा विजय मिळवला होता.
खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले,''आम्ही सकारात्कम विचाराने वाटचाल करत आहोत. मागील पर्वात जेव्हा बायो बबलमध्ये होते, तेव्हाची आमची सुरुवात काही चांगली झाली नव्हती. पण, त्यानंतर आम्ही अपराजित मालिका कायम राखली होती. डिसेंबर आणि जानेवारी हा एका पर्वासाठी महत्त्वाचा टप्पा असतो आणि त्यामुळे आम्हाला सकारात्कम विचारानेच पुढे जायचे आहे.इव्हान व्हुकोमानोव्हिचकेरळा ब्लास्टर्स, मुख्य प्रशिक्षक
Tags
क्रीडा

.jpg)