नामांतरावरून भाजपमध्ये वाद

 


  • भाजप खासदार सुजय विखे पाटील यांची नाराजी

अहमदनगर:  अहमदनगर महापालिकेने शहराच्या नामांतराबाबत प्रस्ताव पास करून राज्य सरकारला सादर करण्याचे आदेश शिंदे-फडणवीसांनी काढले आहेत. सरकारने घेतलेल्या भूमिकेवर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातली मागणी केली होती.
अहमदनगरचे नामांतर करताना जिल्ह्यांतील लोकांचे काय मत आहे, हे शिंदे-फडणवीस सरकारने विचारात घ्यायला हवे. शहरातील लोकांना नामांतराबाबतचा कोणताही निर्णय लादू नये. नगरच्या नामांतराची मागणी नगरमधून कुणीही केलेली नाही.
ज्या नेत्यांकडे विकासाची दृष्टी नाही ते नेते शहराच्या नामांतराची आणि विभाजनाची मागणी करतात. नगरचे विभाजन व्हावे असे फक्त ठराविक लोकप्रतिनिधींनाच वाटते. विभाजनमुळे जिल्ह्याची ताकद कमी होईल जे भावी पिढीसाठी धोकायदायक असल्याचे विखे यांनी म्हटले आहे.जिल्ह्याबाहेरील व्यक्तीने केलेल्या मागणीमुळे निर्णय घेतले जाणार असतील तर त्याचे स्थानिक पातळीवरील राजकारणात त्याचे पडसाद उमटतील, असे म्हणत सुजय विखेंनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post