कल्याण आरटीओ विरोधात सर्वपक्षीय रिक्षा संघटनांचे धरणे आंदोलन

 


डोंबिवली / शंकर जाधव :कल्याण आरटीओ अधिकारी व यांच्या संगममताने सुरू असलेली लूट थांबवा अशा मागण्यांची दखल घ्यावी यासाठी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात सर्वपक्षीय रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.कल्याण आरटीओ प्रशासन रिक्षा चालकांचे कंबरडे मोडत आहे. प्रशासनाकडून होणारी लूट आणि छळवणूक थांबवली पाहिजे. सामान्य रिक्षा चालकाला जगणे मुश्कील होत असल्याचे रिक्षा युनियनतर्फे सांगण्यात आले. सकाळपासून सर्वपक्षीय रिक्षा युनियनचे पदाधिकारी आंदोलनास बसले होते. सांयकाळीपर्यत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाची दखल घेतली नसल्याने संघटनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

     पूर्वेकडील इंदिरा चौकात  लालबावटा युनियनचे काळू कोमास्कर, रिक्षाचालक मालक युनियन भाजप प्रणित चे संजय देसले, दत्ता माळेकर  महाराष्ट्र रिक्षा चालक सेना डोंबिवली शहरचे  संजय मांजरेकर, रिक्षाचालक मलक युनियनचे अंकुश म्हात्रे, उदय शेट्टी, एकता रिक्षा चालक मालक सेनेचे सुदाम जाधव, आर पी आय रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संजय पवार, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अनिल वलेकर, आदर्श रिक्षा चालक मालकचे  देवराव चव्हाण, रिपब्लिकन वाहतूक सेना आनंदराज आंबेडकर गटाचे आनंद नवसागरे धरणे आंदोलनास बसले होते.

     प्रति दिन 50 रुपये दंड आकारणी थांबवा आणि मीटर रिकॅलिब्रेशनसाठी तीन महिन्याची मुदत द्या. सीएनजी बाटला टेस्टिंगकरिता होणारी रूट थांबवा. सीएनजी बाटला ऑनलाईन पासिंग मधील घोटाळा थांबवावा. पासिंग ट्रॅकवरील रेडियम व स्टिकरच्या मार्फत चालणारा भ्रष्टाचार बंद करा. बजाज फायनान्स व आरटीओ अधिकाऱ्यांच्या संगनमताने रिक्षा मालकांच्या संमती शिवाय परवाना हस्तांतरण होत असलेला घोटाळा थांबवा. कल्याण आरटीओ अधिकारी व यांच्या संगममताने सुरू असलेली लूट थांबवा अशा मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

     प्रवासी रिक्षा परवाना रिन्यूव्हल, रिक्षा स्क्रॅप, रिक्षा पासिंग सीएनजी, स्टेट एडमिन, नवीन परमिट, परमिट गाडी ट्रान्सफर, लोन कॅन्सल, डुप्लिकेट आर सी बुक, लायसन्स, रिक्षा बॅच, लर्निंग लायसन या माध्यमातूनही होणार भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. त्याचप्रमाणे  रिक्षा ट्रान्सपोर्ट  यामध्येही भ्रष्टाचार होत आहे असे यावेळी लालबाटा युनियन अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी सांगितले. सकाळी अकरा वाजल्यापासून सर्वपक्षीय रिक्षा संघटनेचे पदाधिकारी या धरणे आंदोलनात बसले होते. मात्र दुपारी साडेचार वाजले तरीसुद्धा आरटीओ अधिकारी यांनी याकडे लक्ष दिले नाही. आरटीओ अधिकारी येऊन आमच्या मागण्याकडे लक्ष देतील अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती मात्र आरटीओने याकडे कानाडोळा या कृतीबाबत संघटनेच्या पदाधिकारी  नापसंती व्यक्त केली.



Post a Comment

Previous Post Next Post