- नियमबाह्य वीज बिलातून नागरिकांची सुटका करणार - आ. संजय केळकर
दिवा : वीज बिलातील वहन आकार नियमबाह्य असून या संदर्भात आपण अधिवेशनात आवाज उठवून नागरिकांना न्याय द्यायचं काम करणार असे ठाणे शहर आमदार संजय केळकर यांनी टोरंट ऑफिस कलवा येथे आज झालेल्या मीटिंगमध्ये सांगितले.
वीज देयकासह प्रत्येक ग्राहकाकडून वहन आकार वसूल केला जातो हा आकार नियमबाह्य असल्याचा दावा मंदार भट यांनी केला आहे. वीज वितरण कंपन्या सर्व प्रकारच्या ग्राहकाकडून वीज वहन आकार वसूल करतात. राज्य सरकारी महावितरण कंपनी नोव्हेंबर 2016 पासून ही वसुली करीत आहे ही वसुली नियमबाह्य असल्याने ती एक प्रकारे लूट आहे या लुटीचा आकडा जवळपास 70 ते 80 हजार कोटी रुपये असल्याचे मंदार भट यांनी सांगितले. या संदर्भात ते न्यायालयीन लढा लढत आहेत. वहन आकार नियमबाह्य आहे, वीज कायदा व त्यामधील सुधारणा नुसार हा वहन आकार केवल ओपन एक्सेस अर्थात 1 मेगा व्हॉटहुन अधिक थेट वीज खरेदी करणाऱ्या कडूनच वसूल करता येतो. पण राज्यातील सर्व वीज वितरण कंपन्या हा आकार सर्वच ग्राहकाकडून वसूल करीत आहेत.
मुख्य म्हणजे ही वसुली फक्त महाराष्ट्रातच सुरू आहे. महाराष्ट्रात शिंदे फडवणीस सरकार आहे आणि हे सरकार लोकहिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. त्यामुळे लोकांच्या हिताचा निर्णय हे सरकार घेइल. या संदर्भात आपण ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांस शिष्टमंडळासोबत भेटून या संदर्भातली माहिती देऊ असे संजय केळकर यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांच्याबरोबर मंदार भट, ठाणे शहर सरचिटणीस मनोहर सुखदरे, दिवा मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे, कलवा मंडळ अध्यक्ष हिरोज कपोते, नरेश पवार, मुंब्रा मंडळ अध्यक्ष कुणाल पाटील, कौसा मंडळ अध्यक्ष सोहिल शेख, शील मंडळ अध्यक्ष साहिल पाटील, दिवा वार्ड अध्यक्ष नागेश पवार, कुणाल निंबाळकर, कनयालाल विश्वकर्मा, सुशांत बोबे, महेश विनरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
