दिग्दर्शक रोहित शेट्टीचा शुटिंगच्या सेटवर अपघात

 


वेब सीरिजच्या शुटिंगदरम्यान रोहित शेट्टीच्या हाताला दुखापत झाली असून त्याला हैदराबादमधल्या कामिनेनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इंडियन पोलिस फोर्स या वेब सीरिजचे शूटिंग सुरू असताना  कार चेस सीक्वेन्सच्या शूटिंगच्यावेळी  हा अपघात झाला. 

रोहित शेट्टी सध्या एका वेब सीरिजवर काम करत आहे. रोहित शेट्टी पहिल्यांदाच वेब सीरिजचे दिग्दर्शन करत आहे. या सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी यांच्यासारखे दिग्गज कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत. या वेब सीरिजचा फर्स्ट लूकही जारी करण्यात आला आहे. या वेब सीरिजचे शुटिंग हैदराबादमध्ये सुरु आहे. या दरम्यानच रोहित शेट्टी यांच्या हाताला दुखापत झाली. 

मिळालेल्या माहितीनुसार एक छोटीसी शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. सध्या त्याची प्रकृती ठिक असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रोहित शेट्टीची इंडियन पोलिस फोर्स ही वेबसिरीज अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post