ठाणे - जगभरात ८ जानेवारी हा दिवस विश्व बौद्ध धम्मध्वज दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्यसाधून ठाणे अंबिकानगर २ येथील प्रज्ञा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे धम्म ध्वज दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी धम्म ध्वजास मानवंदना देऊन पंचशील त्रिशरण घेण्यात आले. यावेळी प्रज्ञा फाऊंडेशनचे अध्यक्ष तुळशीराम मगरे,बाबासाहेब साबळे,विमलताई शरणागत,द्वारकाआई मोटे,विश्वास मगरे,शरद मोरे, बाळा आठवले,कैलास मगरे आदी उपस्थित होते.
