सत्यशोधक विद्यार्थी संघटना आक्रमक
जळगाव: कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत येणारे के.सी. ई सोसायटीचे मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव येथील महाविद्यालय प्रशासनाने कोरोना नंतर कमवा आणि शिका योजना जी विद्यार्थ्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासात भर पाडणारी असते. जीचा उद्देश्य समाजातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिकता शिकता कमविण्याची संधी देणे असा असतो ती सुरूच केली नाही आणि जवळ जवळ कायमची बंद करण्याचा प्रशासनाचा हेतू लक्षात घेवून सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने युद्ध पातळीवर ती योजना सुरू करावी म्हणून संघर्ष केला.
तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना दि.२२.०२.२०२२ ला या संदर्भात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने राज्य सदस्य अविनाश तायडे आणि टीम यांनी उदय सामंत यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर करून सतत पाठपुरावा केला. नंतर विद्यापीठात कुलगुरूंना देखील दि. १२-०८-२०२२ ला पुन्हा निवेदन देवून त्यांच्याशीं सविस्तर चर्चा करून कमवा आणि शिका योजनेचे महत्व लक्षात आणू दिले होते त्यांनतर पुन्हा मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य यांना दि. २२-०८-२०२२ ला पुन्हा निवेदन देण्यात आले होते आणि सतत पाठपुरावा सत्यशोधक विद्यार्थी संघटना करत राहिली
अखेर 3 जानेवारी 2023 रोजी मूळजी जेठा महाविद्यालय प्रशासनाने नोटीस काढून कमवा आणि शिका योजना पुन्हा नव्याने सुरू केली आणि सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या प्रदीर्घ लढ्याला यश आले.
फक्त 36 विद्यार्थ्यांची निवड बाकी विद्यार्थ्यांनी काय करावे?
सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्य सदस्य मूळजी जेठा महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे विद्यार्थी अविनाश तायडे यांच्या सोबत चर्चा केली असता त्यांनी माहिती दिली की महाविद्यालय प्रशासनाने आंदोलनानंतर कमवा आणि शिका योजना सुरू केली. मात्र एकूण विद्यार्थ्यांपैकी फक्त 36 विद्यार्थ्यांची कमवा आणि शिका योजनेवर निवड केली. परंतु नियम असा सांगतो की महाविद्यालयातील एकूण विद्यार्थी संख्येच्या 2% विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेता यायला हवा आणि एकूण विद्यार्थ्यांपैकी 2% विद्यार्थ्यांची निवड करण्यात यायला हवी होती. परंतु असे असताना देखील प्रशासनाने नियमाची पायमल्ली केली आणि फक्त 36 विद्यार्थ्यांची निवड केली मग उर्वरित विद्यार्थ्यांचे काय? या प्रश्नाला घेवून आम्ही सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने दिनांक. 19 जानेवारी 2023 रोजी महाविद्यालय “कमवा आणि शिका योजनेची लाभार्थी संख्या वाढविण्यात यावी” या मुख्य मागणीला घेवून निदर्शने आणि आंदोलन करून प्राचार्यांना निवेदन सादर केले.
आंदोलन दरम्यान विद्यार्थ्यांना एकत्र करून सर्व परिस्थिती सांगण्यात आली आणि मागील आंदोलन, त्याची वृत्तपत्राची कात्रण वाटून कमवा शिका योजनेची माहिती देण्यात आली आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांची भेट घेवून चर्चा करण्यात आली. चर्चा दरम्यान प्राचार्य यांनी आम्ही 36 विद्यार्थ्यांच्या वर विद्यार्थी संख्या वाढवू शकत नाही त्याने महाविद्यालयावर आर्थिक भार येतो परंतु तरी देखील विद्यार्थी आपल्या मागणीवर ठाम असल्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या महाविद्यालय प्रशासनाची मीटिंग घेवून तिथे मांडण्यात येईल असे आश्वासन दिले.
आंदोलनाची पुढची पायरी काय?
परंतु महाविद्यालय प्रशासनाने मागणी मान्य नाही केली तर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेने आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे अशी माहिती संघटनेचे राज्य सचिव अविनाश तायडे यांनी दिली आहे.
