पंचक्रोशीतील भाविक मानाच्या पालखीचे साक्षीदार
डोंबिवली, ( शंकर जाधव ) : श्री खरवलीआई संस्था मंडळ शिळगांव, आई एकविरा माऊली ग्रुप निलजे गाव तर्फे भव्य पदयात्रा आणि पालखी सोहळा मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या गजरात आणि भंडारा उधळीत नाचत गाजत रविवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता शिळगावाच्या श्री खरवलीआई मंदिराच्या ठिकाणाहून श्री क्षेत्र एकविरा देवस्थान कार्ला येथे निघाली आहे.
आज सकाळी सात वाजता श्री खरवली आई आणि एकविरा आई महाशक्तीची देवीची काकड आरती करण्यात आली. श्री खरवलीआई आणि एकविरा आई माऊलीची मानाच्या पालखी निमित्ताने दोन देवींची आदिशक्तींची भेट झाली. पंचक्रोशीतील भाविक या मानाच्या पालखीला हजारोच्या संख्येने सामील झाले आहेत. या पालखीला तीन वर्षे पूर्ण होत आहेत.
आईच्या मंदिरात अनेक भक्तांच्या अंगामध्ये आईचे वारे आले होते. शिळगावातील महिलांनी आईच्या पालखी येणार आहे म्हणून रांगोळ्या सुद्धा काढल्या होत्या. कु. मनस्वी किरण वास्कर या लहान मुलीने आई खरवलीआई आणि एकविरा देवीची उत्कृष्ट अशी रांगोळी काढली होती. शिळगावातील ग्रामस्थांकडून नाश्तापाण्याची सोय करण्यात आली होती. पालखीच्या अध्यक्षांकडून दानशूर व्यक्तींना पालखीचे प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले. काही राजकीय नेत्यांनी सुद्धा आई माऊलीच्या पालखीला खांदा दिला.
खरवलीआई माती की जय एकविरा आई माझी की जय, आई माऊलीचा उदय उदय, पालखीमध्ये जल्लोष पाहायला मिळाला. महाकालेश्वर मंदिर गावदेवी मंदिर या ठिकाणी सुद्धा आईची पालखी नेण्यात आली. गावातल्या महिलांनी आलेल्या पालखीची आणि दोन्ही आई माऊलींची आरती करून हार आणि फुले वाहून, हळद कुंकू, अगरबत्ती, नारळ ,आणि ओटी भरून पूजा अर्चना करण्यात आली.
या पालखीमध्ये मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लावली होती. रात्रीचा पहिला मुक्काम आजिवली हायस्कूल, दुसरा मुक्काम बालवाडी शाळा खोपोली, तिसरा मुक्काम मेहुल बंगला श्री क्षेत्र एकविरा कार्ला, भंडारा दुपारी १२ ते ३ श्री क्षेत्र आई एकविरा देवस्थान कार्ला येथे असणार आहे. परतीचा प्रवास दुपारी ४ नंतर असणार आहे.





