- प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या राजकीय घडामोडीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा चेहरा भाजपच्या नव्या मुख्यमंत्रीचा चेहरा असू शकतो असे म्हटल्याने खळबळ उडाली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी जे बोलणार ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अजिबात आवडणार नाही; परंतु राधाकृष्ण विखे पाटील यांचा चेहरा भाजपच्या नव्या मुख्यमंत्रीचा चेहरा असू शकतो. त्यामुळे ही खेळी आहे. तसेच, नगरमध्ये आपणही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा व्हावा यासाठी बाळासाहेब थोरात प्रयत्न करत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. व म्हणाले, काँग्रेसवर विश्वास ठेऊ नका, असे मी शिवसेना ठाकरे गटाला सांगितले आहे. पृथ्वीराज चव्हाण हे खोटारडे आहेत. त्यांची सत्ता असताना मला मंत्री करतो असे ते म्हणाले होते, असे त्यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील यांच्यावरही निशाणा साधत आंबेडकर म्हणाले, मी चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करायला तयार आहे. कारण त्यांनी कोणी कोणी पैसे गोळा केले, हे अप्रत्यक्षरित्या सांगितले आहे.
Tags
महाराष्ट्र
.jpeg)