बॉक्स ऑफिसला रितेश देशमुख-जेनेलियाचे ‘वेड’



  •  दुसरा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट 

रितेश देशमुखचा ‘वेड’ या चित्रपटाला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, चित्रपटाने शुक्रवारी 1.35 कोटींची कमाई केली. तिसऱ्या शनिवारी या चित्रपटाने 2.72 कोटींचा व्यवसाय केला. याशिवाय रविवारी म्हणजेच १७ व्या दिवशीही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. सुरुवातीच्या आकडेवारीनुसार रविवारी चित्रपटाने 3 कोटींची कमाई केली आहे. यासोबतच चित्रपटाची एकूण कमाई 47.92 कोटींवर गेली आहे.

15 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट सतत नवनवे रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे. दरम्यान, या चित्रपटाने आता आणखी एक टप्पा गाठला आहे. कमाईच्या बाबतीत हा चित्रपट मराठी इंडस्ट्रीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. हा चित्रपट आता फक्त ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या मागे आहे.

2018 मध्ये बनलेल्या ‘सैराट’ चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 80.98 कोटींची कमाई केली. त्याच वेळी, या चित्रपटाचा जगभरातील आकडा 110 कोटींवर पोहोचला होता. हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील एका गाण्यात सलमान खानही दिसला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post