एमआय ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा
मुंबई: पार्थ हळदणकर (17 धावांत 6विकेट) आणि दक्षी चैनी (9 धावांत 4 विकेट) यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर नॅशनल इंग्लिश स्कूल (विरार) संघाने एमआय ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत 14 वर्षांखालील मुले गटात सेंट जोसेफ शाळेवर नऊ विकेट राखून विजय मिळवला. पार्थ आणि दक्षने प्रतिस्पर्ध्यांना 32 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर नॅशनल स्कूलने माफक विजयी लक्ष्य अवघ्या 4.4 षटकांत पार केले.
पराग इंग्लिश स्कूलच्या (भांडुप) रायन इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई (मालाड) स्कूलविरुद्धच्या विजयात गोलंदाज लक्ष्य जोगळेकर चमकला. त्याने 2 धावा देत निम्मा संघ गारद केला. रायन स्कूलचा डाव 26 धावांवर संपला. त्यानंतर पराग इंग्लिश स्कूलच्या सलामीवीरांनी केवळ 3.1 षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले.
15 वर्षांखालील मुली गटात अष्टपैलू प्रियदर्शिनी सिंगने (8 धावांत 4 विकेट आणि नाबाद 43 धावा) आयईएस हायस्कूल (नवी मुंबई) संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिच्या अचूक मार्यामुळे चत्रभुज नरसी मेमोरियल स्कूलचा संघ 71 धावांचीच मजल मारू शकला. त्यानंतर प्रियदर्शिनीने 19 चेंडूत नाबाद 43 धावा करत केवळ 3.4 षटकांतच संघाचा विजय नक्की केला.
संक्षिप्त धावफलक - (14 वर्षांखालील मुले) -1. सेंट जोसेफ स्कूल (डोंबिवली)-15.3 षटकांत सर्वबाद 32 (पार्थ हळदणकर 6-17, दक्ष चैनी 4-9) पराभूत वि. नॅशनल इंग्लिश स्कूल (विरार)- 4.4 षटकांत 1 बाद 35.सामनावीर: पार्थ हळदणकर.
2. सेंट मेरीज आयसीएसई (माझगाव)-17 षटकात 7 बाद 51 विरुद्ध सुलोचनादेवी सिंघानिया शाळा (ठाणे). निकाल -आझाद मैदानावरील मोर्चामुळे सामना रद्द. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण.
3. बालमोहन विद्यामंदिर इंग्लिश मीडियम (दादर)-22 षटकांत 1 बाद 110 विरुद्ध जमनाबाई नरसी स्कूल (जुहू विलेपार्ले) (आझाद मैदानावरील मोर्चामुळे सामना रद्द,दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण.
4. रायन आंतरराष्ट्रीय सीबीएसई (मालाड)-11.4 षटकात सर्वबाद 26 (लक्ष जोगळेकर 5-2) पराभूत वि. पराग इंग्लिश स्कूल (भांडुप)-3.1 षटकात बिनबाद 30. सामनावीर: लक्ष जोगळेकर.
5. माटुंगा प्रीमियर स्कूल-39.5 षटकांत 209/9 (देवाशिष घोडके नाबाद 80, ऋग्वेद राणे नाबाद 30; ध्रुव मोरे 3-33) विजयी वि. अवर लेडी पर्पेच्युअल सुकॉर (चेंबूर)-22.5 षटकांत सर्वबाद 103 (अमिमेश घोरपडे 3-11) सामनावीर: देवाशिष घोडके.
6. विबग्योर रूट्स अँड राइज (मालाड)-30 षटकांत 209/9 (अरहम जैन नाबाद 54, शिवेन केनिया 45; रणवीर दिघे 3-41) विजयी केंद्रीय विद्यालय आयआयटी (पवई)-16 षटकांत सर्वबाद 80 (विवान चंदक 5-) 13, जश सेठ 3-41). सामनावीर: अरहम जैन.
7. अमुलख अमीचंद इंटरनॅशनल स्कूल (माटुंगा)-15.5 षटकांत सर्वबाद 93 (मन्नत जोशी 33; फैजान खान 3-14) विजयी वि. अंजुमन इस्लाम (तुर्भे)-17.5 षटकांत सर्वबाद 82 (आदिल खान 23; जतीन अनाम 3-16, आयुष) मेहता 3-16, मन्नत जोशी 2-8)
सामनावीर: मन्नत जोशी .
16 वर्षांखालील मुले गट - 1. सेंट फ्रान्सिस झेवियर्स स्कूल (कांजूरमार्ग)-16 षटकांत 111/5 (अवधूत मेटर 49) वि. रायन इंटरनॅशनल स्कूल (खारघर). निकाल -सामना रद्द. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण)
2. सेंट झेवियर्स स्कूल (ऐरोली)-17.5 षटकांत सर्वबाद 60 (सत्यम 3-11) वि. सेंट अलॉयसियस हायस्कूल (नालासोपारा). निकाल-सामना रद्द. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण)
3. साने गुरुजी इंग्लिश मीडियम स्कूल, दादर-23 षटकांत 102/6 (हर्षराज पवार नाबाद 30, अथर्व पांडे 4-25) विरुदध गोकुलधाम हायस्कूल, गोरेगाव. निकाल -सामना रद्द. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण)
4. स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, कांदिवली-18.4 षटकांत 129/3 (शौर्य शरण 42, आयुष मकवाना 35). निकाल -सामना रद्द. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण)
15 वर्षांखालील मुली गट - 1. सेंट अॅन्स कॉन्व्हेंट स्कूल (वसई)-11.2 षटकांत सर्वबाद 47 (हर्षवी मामानिया 3-11) पराभूत वि. शिशुवन स्कूल (माटुंगा)- 4 षटकांत बिनबाद 48.
सामनावीर: हिरांशी सावला.
2. चत्रभुज नरसी मेमोरियल स्कूल-13.3 षटकांत सर्वबाद 71 (प्रियदर्शिनी सिंग 4-8) पराभूत वि. आईएस हायस्कूल (नवी मुंबई)-3.4 षटकांत बिनबाद 72 (प्रियदर्शिनी सिंग नाबाद 43). सामनावीर: प्रियदर्शनी सिंग.