१५४ पोलीस शिपाईसह ५९ चालक पदासाठी भरती
कोल्हापूर: कोल्हापुरातील पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस परेड ग्राऊंडवर १९ जून रोजी भरती प्रक्रिया होणार आहे. यात पोलीस शिपाई पदाच्या १५४ जागांसाठी ६ हजार ७७७ अर्ज तर पोलीस चालक पदाच्या ५९ जागांसाठी ४ हजार ६६८ अर्ज उमेदवारी दाखल झाले आहेत. संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया ही पारदर्शक व निप:क्षपातीपणे होणार आहे.
१९ ते २७ जून दरम्यान होणाऱ्या भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी आरएफआयडी या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदाच वापर होणार आहे. तसेच एकाच वेळी दोन ठिकाणी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना देखील चार दिवसांची मुदताढ असेल. तसेच पोलीस भरती दरम्यान उमेदवारांच्या शारीरिक चाचणी वेळी पावसाचा अडथळा आल्यास ही शारीरिक चाचणी कसबा बावडा ते शिये या मार्गावर घेण्याची पर्यायी व्यवस्था देखील करण्यात आल्याची माहिती सुद्धा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.
महाराष्ट्र पोलीस दलाची भरती ही मेरिटवर व पारदर्शक होते. दरवर्षी आमची गोपनिय यंत्रणा आहे त्यांना आम्ही सक्रिय करत असतो. कुठलाही एजंट आपल्याला आश्वासन देत असेल, तर त्यावर विश्वास ठेवू नका. त्यांच्या अमिषाला बळी पडू नका. तसे निदर्शनास आले, तर आमच्याशी संपर्क करा, असेही आवाहन करण्यात आले आहे