प्रज्ञा फाऊंडेशनतर्फे नामांतर दिन उत्साहात साजरा

 



मुंबई : औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे यासाठी आंबेडकरी अनुयायांनी सुमारे १६ वर्ष अखंड संघर्ष केला. या संघर्षात अनेक आंबेडकर अनुयायांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. तर अनेकांचे संसार बेचिराख झाले, या सोळा वर्ष्याच्या प्रदीर्घ संघर्षानंतर १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. या दिनी  नामांतर दिन संपूर्ण राज्यात साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून प्रज्ञा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे ठाणे अंबिकानगर २ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कमान प्रतिकृती सह डॉ बाबासाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून नामांतर दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी स्थानिक मा नगरसेविका एकताताई भोईर, जेष्ठ नेते सुखदेव उबाळे,प्रल्हाद मगरे, विमलताई शरणागत, पत्रकार तेजस वाघमारे, उदय कासारे, प्रज्ञा फाऊंडेशनचे अध्यक्ष तुळशीराम मगरे, परेश मोटे,बाबासाहेब साबळे,सुशांत साबळे,सुशील शरणागत,समाधान सावंत, शुभम वारे,छायाताई बचुटे,सुमनताई शरणागत, परेगताई डोंगरे,पार्वतीताई जाधव,शांताबाई आठवले,राजू मोरे,सूरज मगरे,रवी मोरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post