दत्तनगर बीएसयुपी प्रकल्पातील नागरिकांचा १४ वर्षाचा वनवास संपला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे मानले आभार 

डोंबिवली / शंकर जाधव :  गेली १४ वर्ष डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर बीएसयूपी प्रकल्पातील सुमारे ४५० लाभार्थींच्या  हक्काच्या घरासाठी ' बाळासाहेबांची शिवसेना ' डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे हे शासन दरबारी पाठपुरावा करत होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी मोरे यांनी हा विषय सामान्य नागरिकांसाठी महत्वाचे असल्याने या लाभार्थ्यांना घरे मिळवून दिली.बुधवारी रात्री कल्याण येथे विकास लोकापूर्ण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे येणार आहेत.या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दत्तनगर येथील बीएसयूपी प्रकल्पातील लाभार्थ्यांना घरांची चावी दिली जाणार आहे.यावेळी माजी नगरसेवक राजेश मोरे हेही उपस्थित राहतील. लाभार्थ्यांचा दतननगर बीएसयूपी रहिवासी संघाला घेऊन मोरे हे कल्याण निघाले.यावेळी देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन लाभार्थी ढोल-ताश्याच्या गजरात डोंबिवलीतून निघाले.

 यावेंळी राजेश मोरे म्हणाले, आज लाभार्थ्यांचा १४ वर्षाचा वनवास संपला आहे.२००8 साली बीएसयूपी प्रकल्पाची घोषणा झाली आणि २०११ पासून प्रकल्प सुरू झाला.प्रकल्प सुरू झाला पण लाभार्थींना भाडे तत्वावर घर घेणे परवडत नव्हते.या लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे मिळावी याकरता मी तीन दिवस उपोषण केले.जनतेचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी प्रकल्पातील लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे मिळावी म्हणून प्रयत्न केले.आज या लाभार्थ्यांना हक्काची घरे मिळणार असल्याने यासारख्या मोठा आनंद नाही.



Post a Comment

Previous Post Next Post