शीळ- मुंब्रा- कळवा ग्राहकांसाठी दावत- ए- इफ्तारचे आयोजन

 


टोरंट पॉवरने आयोजित केलेल्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिवा \ आरती परब  : या वर्षीही, एकता आणि समुदाय संबंध वाढवण्याच्या उद्देशाने टोरंट पॉवरने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. रमजानचा महिना सुरू आहे, गुरुवारी १२ मार्च रोजी, टोरेंट पॉवरद्वारे शीळ- मुंब्रा- कळवाच्या नागरिकांसाठी डायमंड बँक्वेट हॉल, कौसा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शहरातील सुमारे ३०० मान्यवर उपस्थित होते. 


या कार्यक्रमाला सर्व पोलीस ठाण्यांमधील अधिकारी, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, प्रमुख राजकीय व्यक्ती, विविध माध्यम प्रतिनिधी आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी टोरटकडून जीवन क्लार्क- उपाध्यक्ष, जय पंड्या-महाव्यवस्थापक, चेतन बदियानी- वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, ब्रिगेडियर विनय बहल- चीफ ऑफ सेक्युरिटी, पीआरओ शशिकांत कोठेकर अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व पाहुण्यांचे जिव्हाळ्याने स्वागत केले. 


हाफिज रोशिक रझा यांनी उपस्थित पाहुण्यांना रमजान आणि इफ्तारचे महत्त्व समजावून सांगितले. पाहुण्यांनी टोरंट पॉवरच्या व्यवस्थेचे कौतुक करून सांगितले की, अशा सामाजिक कार्यक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये सहकार्य, शांतता आणि सुसंवाद वाढण्यास मदत होते. टोरंट पॉवरचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी यांनी कंपनीच्या लोगोमध्ये झालेल्या बदलाची माहिती पत्रकारांना दिली आणि सांगितले की, अशा कार्यक्रमांमुळे कंपनी आणि सामाजिक समुदाय यांच्यातील संबंध मजबूत होतात.



Post a Comment

Previous Post Next Post