फेरीवाला प्रश्नांवर पालिका आक्रमक

 


डोंबिवली स्टेशनबाहेरील कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी

डोंबिवली / शंकर जाधव :  सतत वर्दळ असलेला डोंबिवली स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाल्यांच्या विळख्यात हे डोंबिवलीकरांना नवीन नाही.एकीकडे फेरीवाल्यांची नोंदणी झाली असताना त्यांच्या जागेचा प्रश्न कागदावरच अडकला आहे तर दुसरीकडे स्टेशन बाहेर अतिक्रमण करून नागरिकांना त्रास होत असल्याची वास्तविकता अद्याप बदलण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे.आता पुन्हा नव्याने मनसेने फेरीवाला अतिक्रमण मुद्दा उचलल्याने कडक कारवाई सुरू झाली आहे.मात्र या करवाईत सातत्य ठेवण्याची मागणी डोंबिवलीकरांकडून होत आहे.

   काही महिन्यांपूर्वी भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी अनधिकृत फेरीवाल्यांविषयात पालिका प्रशासनाला धारेवर धरले होते.प्रशासनाने कारवाईची सुरुवात केली असली तरी त्यात सातत्य नव्हते.शिवसेनेने यावर आक्रमक भूमिका घेत चार- पाच वर्षांपूर्वी शिवसैनिकांनी फेरीवाले हटविले होते.यानंतर मनसे शहरअध्यक्ष मनोज घरत यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा फेरीवाला अतिक्रमण प्रश्न उपस्थित करत पालिकेच्या कारवाईवर बोट दाखविले होते.मनसेने फेरीवाला प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचे जाहीर करताच पालिकेला जाग आली.दोन दिवसांपासून डोंबिवली स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झाल्याचे दिसत असल्याने याचे श्रेय मनसेला जरी जात असले तरी या कारवाईत सातत्य राहिला का ? मनसेचा इशाऱ्याला पालिका प्रशासन गांभीर्याने घेतील का के लवकरच दिसेल.

गरिबांनी पोट भरले पाहिजे, मात्र फेरीवाल्यांची कुठे बसावं याचे नियोजन पालिका प्रशासनाने करणे आवश्यक आहे. डोंबिवली स्टेशनपासून १५० मीटर पर्यत फेरीवाले बसता कामा नये यावर प्रशासनाने लक्ष द्यावे. मनसेकडून १५ दिवसाचे अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर मनसेची भूमिका स्पष्ट होईल. नोंदणीकृत फेरीवाल्यांना बसल्यास जागा ठरविणे ही प्रशासनाचे जबाबदारी आहे. आम्ही फेरीवाल्यांच्या विरोधात नाही.पण स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झालाच पाहिजे. 

मनोज घरत, अध्यक्ष मनसे डोंबिवली 

 

डोंबिवली स्टेशनबाहेरील परिसर फेरीवाला मुक्त झालाच पाहिजे.डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन बाहेरील परिसर फेरीवाला मुक्त होऊ शकतो तर डोंबिवली पूर्वे का नाही होत? प्रशासनाची मानसिकता तशी दिसत नाही.

  प्रसाद आपटे ( डोंबिवलीकर ) 

 

खर पाहता प्रशासनाची मानसिक हवी तर फेरीवाला नियोजन होऊ शकतो.नोंदणीकृत फेरीवाला होऊनही त्यांना बसण्यास जागा दिली जात नाही हा त्यांच्यावर अन्याय नाही का ? दुसरीकडे स्टेशन बाहेरून बसून फेरीवाले शहरात डाग लावीत आहेत.शहर स्वच्छ व सुंदर बनवणं सर्वांची जबाबदारी आहे.डोंबिवली पश्चिमेला हे शक्य झालं तर पुर्वेला का होत नाही? 

  विशाल शेटे,संस्थापक,अध्यक्ष,सेफ्टी वेलफेअर असोसिएशन

 


Post a Comment

Previous Post Next Post