आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या सुवर्णा कांबळे ह्या हिरकणी पुरस्काराने सन्मानित

दिवा :  दिवा शहरातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यकर्त्या सुवर्णा कांबळे यांचा, दैनिक वृत्तपत्र "आत्ताच एक्सप्रेस " समूहाच्या वतीने 13 व्या, वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री देविका दफ्तरदार यांच्याहस्ते हिरकणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

        सदर पुरस्कार स्वीकारताना सुवर्णा कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले की, हा हिरकणी पुरस्कार माझ्या एकटीचा संन्मान नसून सर्व जातीय माझ्या महीला आणि माझे कार्यकर्ते यांचा हा सन्मान असून, त्यांना मी तो अर्पण करते. माझे यश, सक्रियता, आदर्श हे राजमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई आणि माता रमाई यांच्या विचारांची पुण्याई आहे असे मनोगत व्यक्त केले.


Post a Comment

Previous Post Next Post